esakal | अभ्यास केलाय पण लक्षात राहत नाही? त्यासाठी 'ही' सोपी तंत्रे नक्की वाचा!
sakal

बोलून बातमी शोधा

Student_Tired

हार्वर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्तेच्या सिद्धांतानुसार प्रत्येकाच्या विशेष प्राविण्य असणाऱ्या बुद्धिमत्तेनुसार विद्यार्थी ते चित्र रेखाटतील. त्यांनी सांगितलेल्या नऊ प्रकारच्या बुद्धिमत्ता या प्रत्येकामध्ये असतात, परंतु यातील एक बुद्धिमत्ता विशेष प्राविण्य राखून असते आणि ती एकंदर ज्ञान आणि विचारप्रकियेवर विशेष प्रभाव टाकते.

अभ्यास केलाय पण लक्षात राहत नाही? त्यासाठी 'ही' सोपी तंत्रे नक्की वाचा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आपण मेंदूमध्ये ज्ञानाचा संग्रह हा शृंखला पद्धतीने करत असतो. जुने अनुभव, पूर्वीचे ज्ञान यांना जोडून आपण नवीन ज्ञान साठवित असतो. मानवी मेंदूमध्ये विचारांचे अनुभवानुसार, त्या त्या जातीचे ज्ञान जाळीप्रमाणे साठवलेले असते असे आपण म्हणू शकतो. 

उदाहरणार्थ, कुठलाही संदर्भ न देता एखाद्या अनोळखी शिक्षक/परीक्षक/बाह्य व्याख्याते यांनी कुमारवयीन विद्यार्थ्यांना सफरचंदाचे चित्र रेखाटायला सांगितले. त्यासाठी त्यांनी आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून दिले व ठराविक वेळ दिले, तर सर्व विद्यार्थी सारखेच चित्र काढतील का? याचे उत्तर निश्चितच नाही, असे असणार आहे. सफरचंद असा शब्द वाचल्या किंवा ऐकल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर पूर्वानुभवातले सफरचंद उभे राहिले. साधारणपणें आकार, रंग सारखाच तरीही विद्यार्थी वेगवेगळी चित्रे कशी काढतील? याला मानसशास्त्रीय अधिष्ठान आहे. 

हार्वर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्तेच्या सिद्धांतानुसार प्रत्येकाच्या विशेष प्राविण्य असणाऱ्या बुद्धिमत्तेनुसार विद्यार्थी ते चित्र रेखाटतील. त्यांनी सांगितलेल्या नऊ प्रकारच्या बुद्धिमत्ता या प्रत्येकामध्ये असतात, परंतु यातील एक बुद्धिमत्ता विशेष प्राविण्य राखून असते आणि ती एकंदर ज्ञान आणि विचारप्रकियेवर विशेष प्रभाव टाकते. याचे आपण सविस्तर उदाहरण घेऊ. भाषिक बुद्धिमत्ता प्राविण्य असणारा विद्यार्थी सफरचंदाचे चित्र, तर काढेलच; परंतु त्याचबरोबर त्याचा भर हा शाब्दिक वर्णनावर असेल. प्रत्येक भागाला नाव देईल, काव्यपंक्ती टाकेल, आकर्षक लेखनाकडे विशेष लक्ष असेल. दृश्य बुद्धिमत्ता असणारा विद्यार्थी सफरचंदाच्या चित्राबरोबर झाड, पक्षी आणि इतर दृश्य बाबी रेखाटण्याचा प्रयत्न करेल.

- 'सरकार, शाळांच्या फी वाढीबाबत काहीतरी करा'; खासगी शाळांकडून पालकांची पिळवणूक

गणितीय बुद्धिमत्तेचा विद्यार्थी टेबलावर प्लेटमध्ये ठेवलेले मधोमध कापलेले, अंतरंग, बाह्यरंग चित्रबद्ध करेल. निसर्गविषयक बुद्धिप्रावीण्य असणारा निसर्गचित्राप्रमाणे रेखाटन करेल. अवकाशीय बुद्धिप्राविण्याचा विद्यार्थी वजन, आकार, आकारमान, पक्वता यावर भर देईल, कदाचित तुलनात्मक चित्र काढेल. अस्तित्वविषयक बुद्धिप्राविण्याचा विद्यार्थी त्याची वाढ दाखणारी चित्रे काढेल (फुलापासून फळापर्यंतचा प्रवास). सांगीतिक बुद्धिप्राविण्याच्या विद्यार्थ्याला चित्र रेखाटनात फारसा वाव दिसत नसला, तरी तो झाडावर वाऱ्याच्या तालावर हिंदोळे घेणारे सफरचंद नक्की रेखाटेल. व्यक्ती अंतर्गत आणि आंतरव्यक्तिगत यांची चित्रे संवेदनशीलता दाखविणारी असतील. वरील एकंदरीत माहितीचा उपयोग आपल्याला ज्ञानप्राप्ती, ज्ञानसंग्रह व अभ्यासात कशाप्रकारे वापरता येईल?

यासाठी आधी तुम्ही तुमच्या बुद्धिप्राविण्याचा शोध घ्या. हे शोधणे फार अवघड नाही. कुठल्या प्रकारे सराव केल्याने तुमच्या समरणात राहते यावर थोडे लक्ष द्या. एकदा का तुमच्या बुद्धिमत्तेचे विशेष अंग समजले की अभ्यासाची पद्धती ठरवने सोपे जाईल. 

- कोरोनाला रोखण्यासाठी आता आलंय 'स्मार्ट हेल्मेट'

उदा. शाब्दिक बुद्धिमत्ता प्राविण्य असेल, तर खूप मोठा आशय महत्वाचे मुद्दे तयार करून बाजूला काढू शकता. हवे त्यावेळी तुम्हाला त्याचे शाब्दिक रूपांतर करता येईल. जास्तीत जास्त आशय संग्रह होईल. दृश्य बुद्धिमत्ता असेल तर चित्ररूपामध्ये सराव करून मुद्दे लक्षात ठेवता येतील. वरील प्रसंगांमध्ये अनोळखी शिक्षक आणि संदर्भ न दिल्यामुळे किंवा न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या विचार व कल्पना शक्तीमध्ये टोकाची विविधता दिसून आली. त्यांनी त्यांच्या पूर्वज्ञान व पूर्वानुभवाचा वापर केला व चित्र रेखाटले. एकप्रकारे इथे त्यांच्या मुक्त विचार प्रक्रियेला चालना मिळाली.

आता हेच चित्ररेखाटन ओळखीच्या, वेगवेगळे विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी (कुठलाही संदर्भ न देता) दिले तर विद्यार्थी चित्र वरीलप्रमाणेच रेखाटतील का? नाही. चित्रकलेच्या शिक्षकांनी दिलेले आणि विज्ञानाच्या शिक्षकांनी दिलेले चित्र रेखाटण्यात व्यक्तिपरत्वे वेगळेपण असेल.

कोरोनामुळे अनेक व्यवसाय अडचणीत, पण हा व्यवसाय तेजीत

आता आपल्या अभ्यासाच्या मूळ मुद्द्याकडे येऊ. एखादा मुद्दा लक्षात कसा राहील यासाठी काही छोटी छोटी तंत्रे वापरता येतील. वर म्हटल्याप्रमाणे ज्ञानाची रचना ही शृंखलाबद्ध असते, जुन्या ज्ञानाला जोडून नवीन ज्ञान आपण संग्रहित करतो. हे ज्ञान व्याख्या, संकल्पना, सूत्रे, प्रकार, नियम, वाक्यप्रचार, म्हणी अशा अनेक उपघटकात वर्गीकृत करून आपण साठवत असतो. यासाठी त्यांचे आकलन होणे गरजेचे असते. संकल्पना स्पष्ट झाली की ती समर्पक उदारहरणाच्या साहाय्याने मांडता येते. यासाठी काही तंत्रे पाहू:

1)आशयाचे प्राथमिक वाचन करावे.
2) न कळलेला भाग पुन्हा वाचवा. कळलेले मुद्दे नोंद करून ठेवावे. 
3) उदाहरण नमूद करावे. स्वतः एखादे नवीन समर्पक स्वतःच्या अनुभवाने व दैनंदिन वापरातील उदाहरण लिहून ठेवावे.
4) मुद्दे, उपमुद्दे, उदाहरण, सूत्रे, नियम, आकृत्या, चिन्हे वेगळे काढावे.
5) खूप मोठा आशय चित्ररूप, आकृतीमय रुपात रेखाटून ठेवता येईल ज्यायोगे संपूर्ण पाठ हा एका दृष्टीक्षेपात, एक पानात सामावता येईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विचारप्रकियेला चालना देणे हे सगळ्यात मोठे काम. एखाद्या बाबीचा विचार हा पाठ्य पुस्तकापुरता मर्यादित राहता कामा नये. त्याचे वेगवेगळे कांगोरे उलगडता आले पाहिजेत. एखाद्या समस्येच्या उत्तरासाठी अनेक बाजूंनी विचार करता यायला हवा. अनेक पर्यायामधून अचूक पर्याय निवडता आला पाहिजे, तो पर्याय बरोबर असल्याची खात्री वेगळ्या मार्गाने करता आली की त्या विषयघटकाचा अभ्यास दृढ होईल. यासाठी वारंवार सराव महत्वाचा आहे.
- प्रा. सुवर्णा पाटील (एसएनडीटी, पुणे)

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

loading image
go to top