esakal | कोरोनाला रोखण्यासाठी आता आलंय 'स्मार्ट हेल्मेट'
sakal

बोलून बातमी शोधा

Become easy to measure body temperature through smart helmets

स्मार्ट हेल्मेट'च्या माध्यमातून शरीराचे तापमान मोजणे झाले सोपे

कोरोनाला रोखण्यासाठी आता आलंय 'स्मार्ट हेल्मेट'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असून सद्यपरिस्थितीमध्ये सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या शरीराचे तापमान मोजणे आव्हानात्मक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांच्या वतीने 'स्मार्ट हेल्मेट'चा वापर केला जात आहे. या हेल्मेटच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणे स्पर्श न करता एका मिनिटात 200 लोकांच्या शरीराचे तापमान मोजले जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बीजेएस यांच्या वतीने यापूर्वी संपूर्ण राज्यात “डॉक्टर आपल्या दारी” उपक्रमामार्फत फिरत्या दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तर तब्बल दीड महिन्यांच्या कालावधीत या उपक्रमाच्या माध्यमातून 15 लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान आता बीजेएस तर्फे शरीराचे तापमान मोजण्यासाठी या स्मार्ट हेल्मेटचा वापर केला जात आहे. यामुळे अधिकाधिक लोकांच्या शरीराचे तापमान कमी वेळेत मोजणे शक्य झाले असून शासनाला देखील याचा फायदा होईल असा बीजेएसचा विश्वास आहे.
----------------
जिओमध्ये आणखी एक मोठी गुंतवणूक; आता कोणी केली गुंतवणूक?
----------------
चांगली बातमी : भारतात कोरोनावरील दुसरी लसही विकसित
----------------
याबाबत माहिती देताना बीजेएसचे संस्थापक शांतीलाल मुथा म्हणाले, "डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमामध्ये दिवसाला आम्ही 200 नागरिकांची तपासणी करत होतो. तसेच आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दीचे प्रमाणात पण वाढत असल्याने या हेल्मेटमुळे केवळ एका मिनिटात दिवसभरात पूर्वीपेक्षा जास्त लोकांचे तापमान मोजले जात आहे. तसेच कंटेन्मेंट झोन मध्ये जाऊन नागरिकांना स्पर्श न करता आम्ही त्यांचे तापमान मोजत आहोत. त्यात असलेल्या कॅमेराच्या साह्याने 'थर्मल इमेज' घेतली जाते. या हेल्मेटमुळे संशयित लोकांना शोधण्यास मदत मिळते."

"या प्रकारचे हेल्मेट इंडीनेशिया, चीन, रशिया, इटली व संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये यांचा वापर केला जात असून भारतात पण याचा वापर करण्याची गरज आहे. भारतात सुद्धा बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हे आधुनिक हेल्मेट यावर उपयुक्त ठरेल. "- शांतीलाल मुथा

स्मार्ट हेल्मेटचे वैशिष्ट्य
- स्पर्श न करता शरीराचे तापमान मोजले जाते
- क्यूआर कोडच्या मदतीने मोबाईलशी जोडणे शक्य
- शरीराचे तापमान मोजून त्याचे छायाचित्र (थर्मल इमेज) काढण्यास सक्षम
- एका तासात 12 हजार तर एक दिवसात एक लाख लोकांच्या शरीराचे तापमान मोजले जाते
- गर्दीच्या व कंटेन्मेंट झोनसाठी उपयुक्त

loading image
go to top