Video : इराची अफलातून जादूगिरी

नीला शर्मा
Saturday, 16 May 2020

इरा सचिन जोशी ही साडेचार वर्षांची मुलगी म्हणजे ‘वंडर गर्ल’ आहे. जादू करून ती काडी आणि नाणं गायब करते. रिकाम्या कागदी पाइपमधून रुमाल काढून दाखवते. अंड्याच्या टरफलावर रंगवलेल्या बाहुलीचं मनोगत सांगते. धमाल म्हणजे भातुकलीच्या माध्यमातून तिचा पाककृती शिकवण्याचा लज्जतदार कार्यक्रम सादर करते.

इरा सचिन जोशी ही साडेचार वर्षांची मुलगी म्हणजे ‘वंडर गर्ल’ आहे. जादू करून ती काडी आणि नाणं गायब करते. रिकाम्या कागदी पाइपमधून रुमाल काढून दाखवते. अंड्याच्या टरफलावर रंगवलेल्या बाहुलीचं मनोगत सांगते. धमाल म्हणजे भातुकलीच्या माध्यमातून तिचा पाककृती शिकवण्याचा लज्जतदार कार्यक्रम सादर करते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इराला एखादं गोष्टीचं पुस्तक सफाईनं वाचताना पाहून तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. तिची आई अमृता जोशी म्हणाली, ‘इंग्रजी शिक्षणपद्धतीऐवजी इराला मराठी शाळेत थेट पहिलीला घालायचं आहे. त्यामुळे तिला अजून अक्षरओळख झालेली नाही. मात्र तिला भरपूर चित्र असणारी गोष्टींची पुस्तकं आम्ही देत असतो. एकेक पान उलटत ती चित्रांचा संदर्भ लक्षात ठेवून कथानक घडाघडा म्हणते. मी आणि सचिन (इराचा बाबा) नाट्यकर्मी आहोत. अनेकदा मी इराला माझ्या नाटकांच्या तालमीला नेते. वरवर पाहता ती चित्रं काढत बसलेली दिसते, पण माझे बरेचसे संवाद तिला पाठ होतात. कहर म्हणजे मी स्वतःशी ते म्हणून पाहताना ही अचानक केव्हा तरी मला थांबवते. प्रश्न विचारते की, तुला त्या काकांनी इथं असं-असं बोलायला सांगितलं होतं ना? मग तू तसं का नाही बोलत?’

इराच्या आईने असंही सांगितलं की, मी समाजमाध्यमांवर अधूनमधून पाककृतीचे कार्यक्रम बघते तर ही पूर्ण एकचित्ताने ते पाहत आणि ऐकत असते. मग भातुकलीच्या खेळात त्या-त्या दिवशीच्या तिच्या मूडप्रमाणे ती पदार्थ ठरवते. ‘यासाठी लागणारं साहित्य आधी मी तुम्हाला सांगते, इथपासून ते झाली आता गरमागरम साबुदाणा खिचडी. लाइक करा. शेअर करा आणि कमेंट जरूर कळवा. टाटा,’ असा समारोप ती करते. मुलांना जमतील असे जादूचे प्रयोग एका संकेतस्थळावर दिसले. तिला विचारलं की, तुला जादू शिकायची आहे का, तर उत्साहाने तयार झाली. ते प्रयोग झटपट बसवले आणि रोज तिला हवं तेव्हा आम्हाला समोर बसवून ते दणक्‍यात चाललेले असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article neela sharma on era joshi