Video : तीन पिढ्यांचा बाहुलीनिर्मितीचा छंद

भावना सोनवणे व त्यांची मुलगी कृष्णा ऊर्फ स्कार्लेट, दोघीनी निर्मिलेल्या बाहुल्यांसह.
भावना सोनवणे व त्यांची मुलगी कृष्णा ऊर्फ स्कार्लेट, दोघीनी निर्मिलेल्या बाहुल्यांसह.
Updated on

लहानपणी आईने बाहुल्या तयार करायला शिकवलं. तो वारसा जोपासत भावना सोनवणे यांनी ही कला त्यांची मुलगी कृष्णा ऊर्फ स्कार्लेट हिच्यापर्यंत पोहोचवली. व्यावसायिक चित्रकार असलेल्या भावनाताईंनी कलामहाविद्यालयातील आपल्या विद्यार्थ्यांना बाहुल्यानिर्मितीचं प्रशिक्षण दिलं. या संदर्भातील पारंपरिक कलांचा अभ्यास करायला प्रेरित केलं.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

जुन्या साड्यांपासून ड्रेस शिवल्यावर उरलेल्या काठपदराचं कापड वापरून भावना सोनवणे यांनी केलेल्या त्या बाहुल्या मन मोहून घेतात. काही बाहुल्या साध्या, तर काही कळसूत्री आहेत. 

फरक स्पष्ट करताना भावनाताई म्हणाल्या, ‘‘साध्या बाहुलीची (डॉल) हालचाल करता येत नाही. कळसूत्री बाहुलीची (पपेट) हालचाल आपण दोरा, आपली बोटं आदींच्या सहाय्याने घडवून आणू शकतो. कागद, कापड वगैरेपासून तयार केलेल्या बाहुल्यांच्या हालचाली घडवत सांगितलेल्या गोष्टी बालगोपाळांना नाट्यमय अनुभव देतात. अशा गोष्टी, त्यातील पात्रांच्या मजेशीर हालचालीमुळे जिवंत वाटतात. लहानपणी आईला दोन - तीन मिनिटांत बाहुली बनवताना पाहिलं. मी ते शिकले आणि कॉलेजच्या काळापर्यंत सुरू ठेवलं. वीस वर्षांपासून मी व्यावसायिक चित्रकार म्हणून कार्यरत आहे. गेल्या अठरा वर्षांत देशपरदेशात जवळपास सत्तर प्रदर्शनांमधून माझी चित्रं लोकांसमोर येत राहिली आहेत.

चार ते दहा फुटांपर्यंत आकारातील मोठी चित्रं मी करते. यात सात-आठ वर्षांपासून बाहुल्या मागे पडल्या होत्या. मात्र मध्यंतरी पॅरिसमध्ये कला अध्ययनानिमित्त गेले असताना हा विषय आला आणि पुन्हा छंद जागा झाला. शिवाय दिल्लीतील बाहुल्यांच्या संग्रहालयातील फेरफटका मारताना मी याबाबत गांभीर्याने विचार करू लागले. वाटलं की, बार्बीसारख्या परदेशी बाहुलीपेक्षा भारतीय पारंपारिक कथांमधील पात्रं आपल्याकडे अधिक आपलीशी वाटतील. मग एका कलामहाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिकवताना या दिशेने काही प्रयोग करून पाहता आले.’’

बदलापूरमध्ये राहणाऱ्या भावनाताईंनी असंही सांगितलं की, दर उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या मुलीबरोबर नवनवं काही करून बघणं चाललेलं असतं. यंदा मी तिला बाहुल्या करून दाखवल्या. तिने तिच्या कल्पनेने त्यात भर घातली. आता नऊवारी लुगडं नेसलेली जुनी बाहुली तिच्या मैत्रिणींना खेळण्यांतील कारमध्ये बसवून भाजी आणायला किंवा आणखी कुठे कुठे जाते, असा खेळ पाहून मला मजा वाटते. 

माझ्या लग्नात रुखवतात ठेवण्यासाठी मी केलेल्या बाहुलीपासून ते आता स्कार्लेटच्या फरमाइशीनुसार केलेल्या विविध प्रकारच्या बाहुल्या ती घरात किंवा बाल्कनीत रचते. बाहुल्यांचं गावच जणू. यातील बाहुल्यांचे संवाद आणि हालचाली आम्हा मायलेकींच्या माध्यमातून घडतात. माझ्या आईने मला दिलेला हा कलात्मक वारसा आज माझी मुलगी पुढे नेत आहे, याचा आनंद शब्दांत मावणारा नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com