Video : देशोदेशींचे पदार्थ बनवण्याचा छंद

नीला शर्मा
मंगळवार, 14 जुलै 2020

ती बनवते देशोदेशींचे पदार्थ. जपान, कोरिया, व्हिएतनाम, इजिप्त, भूतान यांसारख्या अनेक देशांचे स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यातली नवता व कलात्मकता तिला हवीशी वाटते. मृगा गुर्जर ही डेटा ॲनॅलिसिस क्षेत्रात काम करणारी इंजिनिअर तरुणी, स्वयंपाकाचा छंद हा ताण घालवत आनंदप्राप्तीसाठी आवश्‍यक मानते.

ती बनवते देशोदेशींचे पदार्थ. जपान, कोरिया, व्हिएतनाम, इजिप्त, भूतान यांसारख्या अनेक देशांचे स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यातली नवता व कलात्मकता तिला हवीशी वाटते. मृगा गुर्जर ही डेटा ॲनॅलिसिस क्षेत्रात काम करणारी इंजिनिअर तरुणी, स्वयंपाकाचा छंद हा ताण घालवत आनंदप्राप्तीसाठी आवश्‍यक मानते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मृगा म्हणाली, ‘‘पुण्यात लहानाची मोठी झाले. पाचवी- सहावीत असताना टीव्हीवर स्वयंपाकासंबंधीचा कार्यक्रम बघण्यात मी तल्लीन व्हायचे. अनेक भारतीय पदार्थ बनवायला शिकले. याचा उपयोग नंतर शिक्षणासाठी लंडनला असताना झाला. शिवाय तिथल्या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला. पदार्थ आवडला की, शेफ मंडळींना त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती विचारणं हे मी नेहमी करते. कॉन्टिनेन्टल पदार्थ आपल्याला फारच थोडे माहीत असतात. चायनीज पदार्थ आपल्याकडे मिळतात, ते त्यांचं भारतीय रूप आहे. मुळातले चिनी पदार्थ याहून वेगळ्या चवीचे असतात. जपान, कोरिया, व्हिएतनाम, भूतान, इजिप्त, ब्रह्मदेश आदी वेगवेगळ्या देशांचे पदार्थ मी चाखले. त्यांपैकी काही करायलाही शिकले. अमेरिका व ब्रिटनमध्ये खाद्य पदार्थांचं फारसं वैविध्य नाही, हे तिथेच मला कळलं. अमेरिकन लोकांचा तऱ्हेतऱ्हेची सॅलडस्‌ तर ब्रिटन माणसांचा मासे व चिप्सवर भर असतो. बर्गर व पिझ्झा या दोन्हीकडे समान आहे. या तुलनेने युरोपातील देश छोटे असले तरी पदार्थांमध्ये कमालीचं वैविध्य आहे.’’

मृगाने असंही सांगितलं की, एके ठिकाणी सूपचा आस्वाद घेत असताना तिथल्या शेफला साहित्य विचारलं. चक्क एकशे दोन घटक त्यात होते. चीनी मैत्रिणींकडून समजलं की, त्यांच्याकडे कित्येकदा नुसतंच भाजलेलं रताळं हे संपूर्ण जेवण म्हणून खाल्लं जातं. स्वयंपाकघरात उत्तम भाज्या, फळं वापरण्याच्या हेतूने, कुंड्यांमधील सेंद्रिय वनस्पतींबद्दलही आवड निर्माण झाली. मुंबईतील एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये शेफ असलेल्या माझ्या मामेभावाने मला कापणं, चिरणं वगैरेतील बारकावे सांगितले.स्वतः स्वयंपाक करणं हा छंद माझ्यासाठी स्वावलंबन, हवा तो पदार्थ हवा तेव्हा करण्याची सोय, संतुलित आहार यांबरोबरच ताण घालवण्यासाठीचं उत्तम माध्यम म्हणून महत्त्वाचा आहे. या छंदासाठी फारसं कुठंही जावं लागत नाही. घरातल्या घरात यातून देशोदेशींच्या पक्वान्नाची चव घेता येते. यात कलात्मक नवनिर्मितीचा आनंद मिळतो. लवकरच मी स्वीडनमधील एका कॅन्सर रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये रिसर्च इंजिनिअर म्हणून रुजू होणार आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article nila sharma on mruga gurjar