Video : फिरता फिरता फॅन्टास्टिक फोटो

Mrunal-Bhopatkar
Mrunal-Bhopatkar

मृणाल भोपटकर या तरुणीने गडकिल्ले, लेह-लडाख, हिमालय व इतर काही ठिकाणच्या फिरस्तीचे विविधरंगी अनुभव छायाचित्रे व व्हिडिओमधून साठवून ठेवले आहेत. स्वयंप्रेरणेने करत असलेल्या निरनिराळ्या प्रयोगांमुळे तिच्या छायाचित्रणात निसर्गाचा जिवंतपणा टिपला जातो. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मृणाल म्हणाली, ‘‘मी नुकतीच बीएस्सी झाले आहे. लहानपणापासून निसर्गात भटकंतीची संधी सातत्याने मिळत गेली. त्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्रातील वेगवेगळे गड व किल्ले बघता आले. याठिकाणी पूर्वी काय काय घडलं असेल, या अवघड मार्गांनी तेव्हाच्या लोकांनी थंडी, वारा, उन्ह, पावसात कशी जा-ये केली असेल, अशी कोडी पडतात. तेव्हाचं इथलं सृष्टिसौंदर्य कसं असेल, माहीत नाही; पण आजच्या निसर्गाची आठवण छायाचित्रांमधून जपूया, अशी काहीशी भावना असते.’’ 

‘लेह-लडाखला मी दोन वेळा गेले. हिवाळ्यात पाहिलेल्या तिथल्या डोंगरदऱ्यांचं रूप हिवाळ्यात बदललेलं असतं. हे बदल टिपण्यासाठी मी काही ठरावीक जागांचं चित्रण दोन ऋतूंमध्ये केलं. ही छायाचित्रं एकापाशी एक, या तऱ्हेने जुळवून मित्रमैत्रिणींना पाठवली. छायाचित्रणाच्या माध्यमातून फरक दाखविणाऱ्या मी केलेल्या नोंदी, मला पुढे पर्यावरणाबद्दलचं निरीक्षण, अभ्यास करायला उपयोगी पडतील.’’

मृणालने असंही सांगितलं की, व्हिडिओ करतानासुद्धा मी मजेशीर प्रयोग करून पाहते. आकाशात पुढे सरकणारे ढग फास्टफॉरवर्ड तंत्रामुळे घाईघाईने पळताना दिसतात. पुण्यातल्या आमच्या घराच्या टेरेसवरून मध्यंतरी मी, क्षणोक्षणी रंग बदलणाऱ्या आकाशाची ओळीने काही छायाचित्रं काढली. ती एकावर एक जोडत कोलाज केलं. ते पाहताना चलचित्रपटात भराभर दृश्‍यं बदलत जातात, तसं वाटलं. टेरेसवर माझ्या मोबाईल हॅंडसेटवर पडणारं रंगीत आकाशाचं प्रतिबिंब मी आईच्या मोबाईलमधील कॅमेऱ्यातून पकडलं. हे छायाचित्र बघताना अनेकांना प्रश्न पडला की, रंगीत आकाशाचं प्रतिबिंब जमिनीवर कसं पडलं. एवढंच नाही तर, त्या छायाचित्रातला माझा हॅंडसेट म्हणजे, आमच्या सोसायटीत खाली छोटा तलाव आहे काय, असा प्रश्न काहींनी विचारला. मला अजून भरपूर ट्रेक करायचे आहेत. वेगवेगळ्या कल्पना सुचत राहतील आणि भटकंतीबरोबरच छायाचित्रणाची माझी वाटचालही खूप आनंदाची ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com