esakal | Video : आदिम संगीताची अवीट गोडी
sakal

बोलून बातमी शोधा

तेलंगणातील आदिलाबाद येथे लंबाडा समाजातील महिलांसोबत प्राची वैद्य.

प्राची वैद्य (दुबळे) यांनी देशातील निरनिराळ्या राज्यांमधील आदिवासी समाजामध्ये जाऊन, त्यांच्यात राहून, त्यांच्या जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग असलेलं संगीत समजून घेतलं आहे. आदिम संगीताचं संग्रहण, अभ्यास व संशोधन करताना त्यांना आदिवासींचं निसर्गाशी असलेलं अद्भुत नातं बघायला मिळालं.

Video : आदिम संगीताची अवीट गोडी

sakal_logo
By
नीला शर्मा

प्राची वैद्य (दुबळे) यांनी देशातील निरनिराळ्या राज्यांमधील आदिवासी समाजामध्ये जाऊन, त्यांच्यात राहून, त्यांच्या जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग असलेलं संगीत समजून घेतलं आहे. आदिम संगीताचं संग्रहण, अभ्यास व संशोधन करताना त्यांना आदिवासींचं निसर्गाशी असलेलं अद्भुत नातं बघायला मिळालं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या अहमदाबादमध्ये राहणाऱ्या प्राची वैद्य (दुबळे) यांनी गेल्या १० वर्षांत छत्तीसगड, झारखंड, बिहार, राजस्थान, हिमाचल प्रदेश, ओडिशा, आसाम, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आदी विविध राज्यांतील आदिवासी भाग पिंजून काढला आहे. तेथील आदिवासी  समाजामध्ये जाऊन त्यांचं संगीत समजून घेण्यासाठी त्या मंडळींची एकंदरीत जीवनशैली जाणून घ्यायची धडपड केली.

त्या म्हणाल्या, ‘‘दहा वर्षांपूर्वी मी गणेश देवी यांना भेटले, तेव्हा मलाही आदिवासी संगीत हे रटाळ, एकसुरी व काहीसं विचित्र वाटायचं. माझं हे मत ऐकल्यावर देवी यांनी सांगितलं की, तू आतापर्यंत घेतलेल्या शास्त्रीय संगीताच्या तुलनेत आदिवासी संगीत तुला कशा प्रकारे भिन्न वाटतं, ते समजून तर घे. त्याचा अभ्यास करून त्याचे निष्कर्ष मांड. यानंतर मी जसजशी आदिवासींना भेटून सगळी माहिती घेत गेले, तसतशा माझ्या जाणिवा विकसित होत गेल्या. वाटलं की, हे संगीत प्रथमदर्शनी एकसुरी वाटलं तरी ते सोपं नाही. याचा अर्थ अत्यंत गहन आहे. मग मी त्यात वापरले गेलेले स्वर, त्यांचा लगाव आदींची संगती लावण्यासाठी त्यांचा इतिहास, रूढी, परंपरा, तत्त्वज्ञान यांसारखे पैलू जाणून घेतले.’’ 

गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवरील छोटा उदेपूर येथील अकादमीत मी अभ्यास केला. देवी यांच्या ‘भाषा रिसर्च’तर्फे आदिम संगीताचं संग्रहण, अभ्यास, संशोधन, दस्तऐवजीकरण केलं. या प्रवासात माझी जीवनदृष्टी बदलून गेली. सध्या मी गुजरात व राजस्थान सीमेवरील डूंगरी भिल्ल यांच्या संगीत परंपरेचा अभ्यास करते आहे, असे त्यांनी सांगितले.