Video : पर्यावरणपूरक राखी बनवण्याचा ट्रेंड

नीला शर्मा 
रविवार, 2 ऑगस्ट 2020

यंदा करोनाचं सावट असलेल्या श्रावणात राखीचंही रूप पालटलेलं अनेक घरांमध्ये दिसणार आहे. बाजारात मिळतील त्या राख्या सॅनिटाइज केलेल्या असतील की नाही, या शंकेने कित्येक घरांमध्ये सहज उपलब्ध वस्तूंपासून राखी तयार करणाऱ्या बहिणी दिसत आहेत. प्रज्ञा देवधर या तरुणीनेही मोठ्या व छोट्यांसाठी कल्पकतेने पर्यावरणपूरक राख्या बनवल्या आहेत.

पुणे - यंदा करोनाचं सावट असलेल्या श्रावणात राखीचंही रूप पालटलेलं अनेक घरांमध्ये दिसणार आहे. बाजारात मिळतील त्या राख्या सॅनिटाइज केलेल्या असतील की नाही, या शंकेने कित्येक घरांमध्ये सहज उपलब्ध वस्तूंपासून राखी तयार करणाऱ्या बहिणी दिसत आहेत. प्रज्ञा देवधर या तरुणीनेही मोठ्या व छोट्यांसाठी कल्पकतेने पर्यावरणपूरक राख्या बनवल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रज्ञा म्हणाली, ‘घरातल्या घरात राहून सहज उपलब्ध साहित्य वापरूनसुद्धा खूप सुंदर राख्या तयार करता येतात, याचा अनुभव मी सध्या घेते आहे. त्या बनविताना प्लॅस्टिकचा वापर मी करीत नाही. पर्यावरणपूरक साहित्य उपयोगात आणल्याचं अवर्णनीय समाधान आहे. दोन - तीन महिन्यांपासून मी क्रोशावर्क शिकते आहे. या माध्यमातून लोकरीची फुलं बनवली. त्यांवर मण्यांची सजावट केली. यापासून राखी तयार करताना मला आणि ती बघताना माझ्या मुलांनाही मौज वाटली. घरी तऱ्हेतऱ्हेच्या लग्नपत्रिका व निमंत्रण पत्रिका साठलेल्या होत्याच. त्यावरील आकर्षक चित्रं कापली. सॅटिनच्या रंगीत पट्टीवर एक - एक चित्र चिकटवून सुंदर राख्या तयार करता आल्या.’

प्रज्ञाने असंही सांगितलं की, लहानग्या भावांसाठीही मजेशीर राख्या तयार केल्या आहेत. जाड कागदातून छोटे छोटे गोल आकार कापले. त्यांवर कलिंगडाची लालचुटुक फोड, तिच्यावरील काळ्याशार बिया दिसतील, असं चित्र रंगवलं. बच्चे कंपनीला आवडणारी कार, सूर्य यांसारख्या चित्रमय राख्या तयार केल्या. माझी मुलं झाडांना राख्या बांधतात. त्यांच्या मनातलं निसर्गप्रेम वाढत राहावं, या भावनेने मी काही राख्यांवर पानं, फुलं व पक्ष्यांची चित्र काढली 
आहेत. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article nila sharma on trend of making eco friendly rakhi

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: