Video : आईने लेकीला लिहिली आगळीवेगळी पन्नास पत्रं

नीला शर्मा
Wednesday, 24 June 2020

अकोले येथील विशाखा ठाकरे यांनी त्यांच्या बालपणीच्या रम्य आठवणी, मनावर कोरली गेलेली जीवनमूल्ये, भावनोत्कट प्रसंग आदी गोष्टी अलीकडेच आपल्या लेकीला पत्रातून सांगितल्या आहेत. कन्या सुगी हिला रोज एक पत्र व टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली कलाकृती, अशी दुहेरी भेट सलग पन्नास दिवस दिली.

अकोले येथील विशाखा ठाकरे यांनी त्यांच्या बालपणीच्या रम्य आठवणी, मनावर कोरली गेलेली जीवनमूल्ये, भावनोत्कट प्रसंग आदी गोष्टी अलीकडेच आपल्या लेकीला पत्रातून सांगितल्या आहेत. कन्या सुगी हिला रोज एक पत्र व टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली कलाकृती, अशी दुहेरी भेट सलग पन्नास दिवस दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

विशाखा ठाकरे या गृहिणीने एक अनोखा उपक्रम नुकताच पार पाडला. त्या म्हणाल्या, ‘‘लोणी (तालुका आर्णी, जि. यवतमाळ) या गावी मी लहानाची मोठी झाले. पाच बहिणी, एक भाऊ यांच्याबरोबरचे खेळ, बाबांचं वाचन- लेखन, शाळा अशा अनेक प्रकारच्या आठवणी माझ्या मनात सतत जाग्या असतात. इतक्‍या की, मला माझ्या यजमानांनी त्या लिहायचा आग्रह धरला. माझे बाबा द. त. नंदापुरे हे त्या भागातील प्रसिद्ध साहित्यिक आहेत. ते अजूनही मला पत्रं लिहितात. तोच वारसा जपायचा ठरवत मी माझी मुलगी सुगी हिला रोज एक पत्र लिहीत गेले. त्यासोबत एक कलाकृती तयार करून देत गेले.

कलाकृती त्या पत्रातील मजकुराला अनुरूप अशा घडवल्या. लहानपणी बाबांच्या प्रभावामुळे मी टाकाऊ वस्तूंपासून काही तरी छान बनवायचे. बाबा सतत प्रोत्साहन द्यायचे. सांगायचे की, आपले छंद जीवनात आनंद फुलवतात. ते कायम जप. सुगीसाठी मी पत्रांची आणि कलाकृतीची मालिका करण्यात गढले आहे, हे कळल्यावर त्यांनी जुन्या लग्नपत्रिका व भेटकार्डांसारख्या वस्तू पाठवल्या. पत्रलेखन आणि टाकाऊ वस्तूंच्या फेरवापराचा त्यांचा वारसा माझ्याकडून माझ्या लेकिपर्यंत पोहोचल्याचं समाधान आहे.

शाळा आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून शिक्षकांचे वेतन....

सुगी आता दहावीत गेली आहे. ती उत्तम की बोर्ड वाजवते. तिने तिच्या या छंदातून संगीतमय जीवनाचा आनंद स्वतः घेत इतरांनाही द्यावा, असं वाटतं.’’

सुगी म्हणाली, ‘‘आईने मला दिलेली ही पन्नास पत्रांची भेट अनमोल आहे. प्लॅस्टिक बाटल्यांचा फेरवापर, जुन्या लग्नपत्रिकांपासून केलेली वॉल हॅंगिंग्ज, बॉक्‍सचं फोटो फ्रेममध्ये केलेलं रूपांतर वगैरे मला नकळतच खूप काही शिकवणारं आहे. तिच्या एका पत्रात चिमणीच्या पिल्लांची गोष्ट होती. त्यासोबत आईने एक सुरेख खोपा तयार केला.

पोलिसांतील माणुसकी : ती बंगळुरुवरून आली, जवळ फक्त १०० रुपये अन्...

‘शर्यत कुणाशीही करू नये,’ हा संदेश माझ्यापर्यंत पोहोचवायला आईने कासवांची गोष्ट पत्रात लिहिली. जोडीला आक्रोड, पिस्ता यांची सालं व खजुराच्या बियांपासून मस्त कासवं बनवली. तिच्या बालपणीच्या आठवणी या निमित्ताने तिने मला अतिशय कलात्मक आणि परिणामकारक पद्धतीने सांगितल्या, यासाठी मला तिचा खूप अभिमान वाटतो.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article nila sharma on vishakha thakare and sugi thakare