शाळा आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून शिक्षकांचे वेतन....

Money
Money

पुणे - एकीकडे खासगी शाळांमधील शुल्क विद्यार्थ्यांकडे थकले आहे. तर दुसरीकडे शाळा आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून शिक्षकांचे वेतन होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षक विनावेतन काम करत असून, त्यांना आर्थिक चणचण सहन करावी लागत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षकांकडून खूप कामे करून घेतली जातात; परंतु त्या तुलनेत वेतन दिले जात नाही. शिक्षकांना मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्यात आता कोरोनामुळे उद्‌भवलेल्या संकटामुळे काही शाळांमधील शिक्षकांना मार्चपासून वेतन दिले जात नसल्याचे शिक्षक सांगत आहेत. विद्यार्थ्यांकडून शुल्कवसुली झाल्यानंतरच शिक्षकांना वेतन दिले जाणार असल्याचा अप्रत्यक्ष पवित्रा शाळांनी घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

‘‘गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. मागील शैक्षणिक वर्षाची थकीत शुल्क आणि येत्या शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरण्यासाठी पालकांना सांगण्यात येत आहे. मात्र शुल्क मिळत नसल्याने आर्थिक अडचण सहन करावी लागत असल्याचे शाळा प्रशासनाकडून कळविले आहे. आणखी किती दिवस विनावेतन काम करावे लागणार, याबाबत काही सांगणे अशक्‍य आहे. त्यामुळे घर चालवायचे कसे, असा प्रश्न एका शिक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

विनाअनुदानित शाळांमधील कोणत्याही शिक्षकांची लेखी किंवा फोनद्वारे अशा प्रकारची तक्रार अद्याप जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे आलेली आहे. मात्र तरीही शाळांनी नियमानुसार शिक्षकांना वेतन द्यावे. याबाबत लवकरच पत्र काढण्यात येणार आहे.
- गणपत मोरे, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com