रुग्णालयांमध्ये जागा नसल्याने घरातला ‘बेड’च स्वतःसाठी राखून ठेवा

CoronaVirus
CoronaVirus

आता आकड्यांमध्ये कोणाला कसले स्वारस्यच राहिले नाही. आज-उद्याच पुण्यातील मृतांची संख्या पाचशेच्या वर पोचेल. नव्या रुग्णांच्या संख्येत दररोज ३५० ते ४०० च्या पटीने वाढ होत आहे. बरे होणाऱ्यांची संख्याही वाढतेय. अशावेळी कोणीतरी सांगतेय म्हणून तोंडाला फक्त मास्क लावून चालणार नाही, तर स्वयंशिस्तीने कोरोनापासून बचावाचा ‘प्रोटोकॉल’ पाळलाच पाहिजे; अन्यथा रुग्णालयांमध्ये जागा नसल्याने घरातला ‘बेड’च स्वतःसाठी राखून ठेवावा लागेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनमुळे सगळ्यांचेच कंबरडे मोडल्याने आपण ‘अनलॉक’च्या दिशेने वेगाने चाललो आहोत. परिस्थिती सुधारण्यासाठी सर्व पातळ्यांवर धडपड सुरू असतानाच आपण ‘कोरोना’कडे डोळेझाक करीत आहोत. मे महिन्यापासून आपण कोरोनासोबत जगायचे, असे म्हणत असताना जूनच्या अखेरीस आपली भाषा, वागण्याची पद्धत आणि मार्च-एप्रिल-मेमध्ये घालून घेतलेली बंधनेही विसरून गेलो आहोत. याचमुळे मास्क न घालणारे ‘सीसीटीव्ही’वर शोधून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची वेळ आली आहे.

लॉकडाउनमधून सवलत म्हणजे कोरोना संपला, असा अर्थ काढून अनेक जण वागत आहोत. त्याचमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. उदाहरणच द्यायचे झाले, तर ग्रीन झोन असणाऱ्या कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयात तीन रुग्ण होते. ही संख्या दीडशेच्या घरात गेली आहे. औंध-बाणेरची हीच स्थिती आहे. म्हणजेच, ज्या भागात रुग्णांची संख्या अधिक होती त्या भवानी पेठ, येरवडा, कसबा पेठ आदी भागांनी योग्य दक्षता घेतली आणि रुग्णसंख्या कमी करण्याचा प्रयत्न केला. तर, ज्या भागात रुग्णसंख्या कमी होती, त्यांनी निष्काळजीपणे वागत आपल्या भागातील संख्या वाढवली. परिणामी, तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतरही आपण कोरोनाची साखळी तोडू शकलो नाही. ही साखळी तोडण्याला आता प्राधान्य द्यायला हवे. त्यासाठी बाधितांच्या संपर्काची माहिती घेऊन संसर्ग पुढे सरकणार नाही, यासाठी यंत्रणा उभी करावी लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com