Ganeshotsav Actors Booking Full
sakal
पुणे - गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने मंडळे, सोसायट्या आणि आयोजकांकडून उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनालाही सुरुवात झाली असून, कलाकारांचे कार्यक्रम आरक्षित होऊ लागले आहेत. विशेषतः मुलांना मोबाइल आणि स्क्रीनपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविणाऱ्या कार्यक्रमांना यंदा पसंती मिळत आहे.