
पुणे : सर्वत्र उत्साहाचे वातावरण, आल्हाददायक वातावरण, सर्वसामान्य धावपटू तंदुरुस्तीसाठी तर प्रमुख धावपटू श्रेष्ठत्वसाठी धावत होते. अशा भारावलेल्या वातावरणात सकाळने आयोजित केलेल्या पाचव्या बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सोलापूरचा अरुण राठोड पुरुषांच्या २१ किलोमीटर शर्यतीत अव्वल ठरला. विशेष म्हणजे या शर्यतीत पाचपैकी चार क्रमांक मिळवून महाराष्ट्रीय धावपटूंनी आपले लांब पल्याच्या शर्यतीतील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.