asha bhosle
asha bhosle

देवानं मला 50 वर्ष दिलेत, त्यातील 25 बाबासाहेबांना देते- आशा भोसले

Published on
Summary

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या 100 व्या जन्मदिवसानिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे

पुणे- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या 100 व्या जन्मदिवसानिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज ठाकरे, आशा भोसले आणि आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी आशा भोसले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. १९६३ साली मी पहिल्यांदा बाबासाहेबांना भेटले. आमची ५८ वर्षांची ओळख आहे. आम्ही अनेकदा भेटत राहिलो. ते लिहित राहिले, त्यांच्या व्यवसायात पुढे जात राहिले. त्यांनी आयुष्यात मला खूप प्रेम दिल आहे, असं ते म्हणाल्या. (Pune Latest News)

साठच्या दशकात मी नवीन घरी आले होते. त्या घरात मंदिर नव्हतं. त्यावेळी बाबांनी मला चांदीच्या ताटात एक शंकराची पिंड आणि नंदी आणून दिला. जेव्हा जेव्हा मी मंदिरात जाते, तेव्हा मला बाबासाहेबांची आठवण येते. त्यांची ती भेट मला न विसरता येणारी आहे. मी सर्वांना ते सांगत असते. ही शंकराची पिंड माझ्या आयुष्यात आल्यानंतर खूप काही चांगल्या गोष्टी झाल्या. काही गोष्टी वाईटही झाल्या पण मी चांगल्याकडे पाहात असते. शंकराच्या पिंडीवरील फुलासारखी मी असल्याचं बाबासाहेब म्हणाले होते. तसंच आयुष्य मी जगत असते, असं आशाताई म्हणाल्या.

asha bhosle
''बाबासाहेबांनी सांगितलेला इतिहासातील प्रसंग डोक्यात फिट होतो''

बाबासाहेबांनी मला खूप प्रेम दिलं आहे. आशा ही खरी बोलणारी बाई आहे. माझ्या घरच्या लायब्रेरीमध्ये अनेक लेखकांची पुस्तके आहेत. बाबासाहेबांची सर्वंच पुस्तके माझ्या लायब्रेरित आहेत. मला दु:ख झालं की मी पुस्तक वाचते. मला देवाने 50 वर्ष तरी दिले आहेत. त्यातनं मी बाबासाहेबांना 25 देऊन टाकते. मी बाबासाहेबांना काही दिलं नाही, आज त्यांना मी एक लाख एक रुपये त्यांच्या चरणी अर्पण करते. बाबासाहेबांनी खूप आयुष्य जगावं. त्यांच्या प्रत्येक सत्कार कार्यक्रमासाठी मी येत राहावं, असं आशाताई म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com