
भिगवण : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नींचा मृत्यू झाला आहे. आषाढी वारीवरून गावी परतत असताना पती-पत्नीचे अपघाती निधन झाल्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.