
बारामती : भाविकांच्या उत्साहाचा साक्षात्कार घडवणाऱ्या आध्यात्मिक यात्रेत संतप्रेमाचा आणि नामस्मरणाचा गोड अनुभव गुरुवारी दिसून आला. संत तुकाराम महाराज यांच्या ‘आनंदें कीर्तन कथा करीं घोष। आवडीचा रस प्रेमसुख।। मज या आवडे वैष्णवांचा संग। तेथें नाहीं लाग कळिकाळा॥’ या अभंगातील तत्त्वाचा प्रत्यय गुरुवारी आला.