
आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. पुणे पोलिसांकडून गर्दीवर नियंत्रणासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी नियोजन केलं जात आहे. १९ जूनला पालख्यांचे प्रस्थान होणार असून लाखो वारकरी यात सहभागी होणार आहेत. वारकऱ्यांची नोंद, वाहनांची संख्या आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआयची मदत घेतली जाणार आहे. तर पालखी सोहळ्यावेळी दिवे घाटातून वाहतूक बोपदेव घाटातून वळवण्यात येणार आहे. तसंच दिवे घाटातील डोंगरावर पालखी सोहळ्यावेळी चढण्यास बंदी घालण्यात आलीय.