
पिराची कुरोली : विठुरायाच्या चरणाचे दर्शन होण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. ही कल्पना मनात रुंजी घालताच, भक्तांच्या ओठांवर ‘विठ्ठल! विठ्ठल!’चा निनाद अनावर झाला. भेटीची उत्कंठा इतकी वाढली की, बोंडले गावाच्या उतारावरून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी प्रेमाने धाव घेतली आणि भक्तिरसात संत सोपानदेवांच्या पालखीची पावन भेटही झाली. या आनंदात सहभागी होण्यासाठी वरुणराजाही प्रसन्न होऊन अवतरला. संध्याकाळी पिराची कुरोली येथे हा पावन सोहळा विसावला.