
वाल्हे : हरिनामाचा जयघोष करीत पंढरीला निघालेल्या वैष्णवांची बुधवारची वाटचाल सुखद होती. हिरव्यागार शिवारातून जाणारी वाट, थंडगार वारा आणि दुपारपर्यंतची अल्पशी वाटचाल, अशा आनंददायक वातावरणाची माउलींच्या पालखी सोहळ्याने अनुभूती घेतली. संपूर्ण सोहळ्यात केवळ वाल्हे येथे दुपारी समाजआरती होते. त्यांची शिस्त लाखो भाविकांनी डोळ्यात साठविली.