
सणसर : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी भक्तिरसात न्हालेला पाहायला मिळाला. काटेवाडीत परीट समाजाने पायघड्यांनी स्वागत केले, तर धनगर समाजाच्या मेंढ्यांच्या रिंगणाने वारकऱ्यांची मने जिंकली. भवानीनगर साखर कारखान्याच्या मैदानावर विश्रांती घेतल्यावर सोहळा रंगला होता. इंदापूर तालुक्यातील सणसर येथे सोहळा मुक्कामी विसावला.
गातों नाचतों आनंदें। टाळघागरिया छंदें ॥
तुझी तुज पुढें देवा। नेणों भावे कैसी सेवा ॥