बारामती - ज्ञानोबा माऊली तुकाराम.....माऊली...माऊली...या जयघोषात मोठ्या भक्तीभावाने गुरुवारी (ता. 26) बारामतीकरांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले. .विठुरायाच्या ओढीने पंढरीकडे निघालेल्या वारक-यांमध्येच विठ्ठलाची मूर्ती पाहून त्यांची मनोभावे सेवा करण्याचा वसा बारामतीकरांनी गेल्या अनेक वर्षांपासून घेतला आहे. वारीला जाता येत नाही पण वारक-यांच्या सेवेसाठी काही ना काही प्रयत्न करण्याचा प्रयत्न आबालवृध्द करतात, त्याचाच प्रत्यय गुरुवारी बारामतीत आला..बारामतीच्या वेशीवर देशमुख चौकामध्ये बारामती नगरपरिषदेच्या वतीने औपचारिक स्वागत करण्यात आले. या प्रसंगी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, मुख्याधिकारी पंकज भुसे, पोलिस निरिक्षक विलास नाळे, वैशाली पाटील यांच्यासह प्रमुख अधिकारी व पदाधिकारी यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले..दरवर्षी प्रमाणे अनेक मंडळ, संस्था, संघटना व वैयक्तिक स्वरुपातही वारक-यांच्या सेवेसाठी बारामतीकर उत्स्फूर्तपणे पुढे आले. जागोजागी वारक-यांच्या स्वागताचे फ्लेक्स व कमानी उभारण्यात आल्या होत्या. शारदा प्रांगणात बारामती नगरपरिषदेने भव्य मंडप उभारला असून त्यात पालखी सोहळा विसावला.दरम्यान शहरामध्ये एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते वारक-यांना रेनकोट वाटप केले गेले. रोटरी क्लबच्या वतीनेही रेनकोट वाटप केले गेले..या शिवाय सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र, बारामती मेडिकल फाऊंडेशन, शारदा हॉस्पिटल, श्रीनिवास नागरी सहकारी पतसंस्था, सोनू साबळे मित्र परिवार, सिद्धी गणेश ट्रस्ट व मंडळ, बारामती सहकारी बॅंक सेवक कल्याण संस्था, तेली पंच मारुती ट्रस्ट, सुभाष चौक मित्रमंडळ, विश्व हिंदू परिषद- बजरंग दल, मुन्ना जाधव मित्रमंडळ, सोमाणी ग्रूप, बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ अधिकारी-कर्मचारी, कन्हैय्या मित्र मंडळ, शिवयोद्धा ग्रूप, आझाद तरुण मंडळ, शरयू फाऊंडेशन, महालक्ष्मी उद्योग समूह, चंद्रकांत शेलार मित्र मंडळ,.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, स्वामी ओम प्रतिष्ठान, काशी कापडी समाज संघ, काशी कापडी युवा मंच, मोता परिवार, श्रीपाद नायर मित्रमंडळ, वाघोलीकर परिवार, संग्राम साळुंखे मित्र परिवार, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, अॅड. वैभव काळे- माई फाऊंडेशन ट्रस्ट, अविनाश बांदल, बीएसएनएनल, रौद्र शंभो प्रतिष्ठान, उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशन, बारामती तालुका मंडप मालक असोसिएशन, छत्रपती छावा संभाजी संघर्ष माथाडी कामगार संघटना, लोहार समाज सेवा संघ-गोरखभाऊ पारसे मित्रमंडळ,.आदित्य हिंगणे मित्र परिवार, महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, अल्फा इंजिनिअरिंग, आत्माराम सावळाराम हिंगणे परिवार, सह्याद्री सोशल फांऊंडेशन, शिवप्रेमी तरुण मंडळ, बबलू शिंदे मित्र परिवार, माऊली फाऊंडेशन, शशांक झगडे मित्र परिवार, महालक्ष्मी इलेक्ट्रीक अॅण्ड इंजिनिअरिंग, महादेव मळा गणेश फेस्टिव्हल, महालक्ष्मी उद्योग समूह, जय अॅटोमोटीव्ह उद्योग समुह, आर. एस. ग्रूप, आर्यन बॉयलर, महात्मा फुले तरुण मंडळ, सदगुरु यशवंत बाबा गोपालन संस्था, हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रतिष्ठान, थंडर बॉईज,.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना बारामती शहर व तालुका, सागर जाधव फ्रेन्डस सर्कल, गणेश गायकवाड मित्र परिवार, अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ, धर्मवीर छत्रपती संभाजी मित्र मंडळ, मारवाड पेठ मित्रमंडळ, महात्मा गांधी चौक तरुण मंडळ, व्ही. ग्रूप, मोरया ग्रूप, सुभाष चौक तरुण मंडळ, गौरव तपकिरे मित्र मंडळ, राष्ट्रवादी काॅंग्रेस बारामती शहर व तालुका, जयदादा पवार युवा मंच, महावीर मेडिकल फौंडेशनचे श्रीपाल हॉस्पिटल, डॉ. राजेंद्र मुथा व परिवार आदींकडून वारक-यांची सेवा केली गेली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.