कात्रज - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतांची पालखी सोहळा पुण्याकडे येत असून, कात्रज-कोंढवा परिसरात दिंड्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भगव्या पताका, ढोल-ताशांचा गजर आणि हरिनाम संकीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता..सकाळपासूनच परिसरातील विविध मंडळांनी, स्थानिक नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी मिळून रस्त्याच्या कडेला रांगोळ्या काढून, तोरणे लावून आणि पुष्पवृष्टी करत दिंड्यांचे स्वागत केले. महिला, पुरुष, लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील भाविकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले..पुण्यधाम आश्रम कोंढवा बुद्रुक येथे दिंडी क्र. ०९, रथामागे ही दिंडी दोन दिवस मुक्कामी होती. तेथील सर्व सेवा कोंढव्याचे माजी सरपंच भरतलाल धर्मावत यांच्या वतीने करण्यात आली. २७ वर्षांपासून ही दिंडी याठिकाणी येते.वारकऱ्यांच्या सेवेसाठी आश्रमाच्या प्रमुख कृष्णाजी कश्यप माताजी, शास्त्रज्ञ विजय भटकर, जालिंदर कामठे, शिरीष धर्मावत, अमोल धर्मावत, मेघशाम धर्मावत आदींनी परिश्रम घेतले. त्याचबरोबर, प्रगती फाऊंडेशनच्या वतीने हभप नाथा महाराज ठाकरबुवा यांच्या दिंडीची सोय करण्यात आली होती..यावेळी वारकऱ्यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम जलतरण तलाव येथे मोफत भोजनसेवा देण्यात आली. यासाठी माजी नगरसेवक प्रकाश कदम, अध्यक्ष प्रतिक कदम, सुधीर डावखर, अनिल ढवण यांनी परिश्रम घेतले.गजराज सोशल फाऊंडेशन व धूत परिवाराकडून वारकऱ्यांसाठी शिवभक्त शिवअभ्यासक ऋत्विक कुळकर्णी यांचे व्याख्यान तर भोजनसेवेचे आयोजन कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शिवपार्वती मंगलकार्यालय येथे करण्यात आली होती..त्याचबरोबर श्रीनिवास संकुल सोसायटी येथे सदस्यांनी आणि साळवे गार्डन येथे बाबासाहेब वायबसे, आश्रुबा वायबसे, नानासाहेब वाघमारे यांनी भोजनसेवेचे आयोजन केले होते. दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून टाळ-मृदुंगाच्या गजरात अभंग गात, नाचत, पुढे वाटचाल केली..अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची, फराळाची आणि विश्रांतीची सोय केली होती. अनेक ठिकाणी सामाजिक संस्थांनी वैद्यकीय सेवा, फर्स्टएड आणि मोबाईल टॉयलेट्सचीही व्यवस्था केली होती. कात्रज-कोंढवा परिसरात वारकरी दिंड्यांचे पारंपरिक ढंगात आणि उत्साहात स्वागत करत वारकरी परंपरेला भक्तिभावाने उजाळा देण्यात आला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.