Ashadhi Wari : वारीनिमित्त मार्केट यार्डमध्ये कोट्यवधींची उलाढाल, सात लाख पत्रावळ्याची विक्री आणि...

बहुतांशी दिंड्या पुढील पंधरा दिवस लागणारा किराणा माल आणि कांदा, बटाटा पुण्यातील मार्केट यार्डातून खरेदी करतात. या माध्यमातून दरवर्षी दोन ते अडीच कोटी रुपयांची उलाढाल होते.
Ashadhi Wari
Ashadhi Warisakal

Ashadhi Wari - दरवर्षी पुण्यामध्ये आषाढी वारी सोहळ्यानिमित्त संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या दोन दिवस मुक्कामी असतात. यासोबत असणाऱ्या बहुतांशी दिंड्या पुढील पंधरा दिवस लागणारा किराणा माल आणि कांदा, बटाटा पुण्यातील मार्केट यार्डातून खरेदी करतात. या माध्यमातून दरवर्षी दोन ते अडीच कोटी रुपयांची उलाढाल होते.

Ashadhi Wari
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर मोठी दुर्घटना! ऑईल टँकरला भीषण आग; काही जणांचा मृत्य झाल्याची भीती

मार्केट यार्डातील भुसार बाजारातून पुण्यात मुक्कामी असणाऱ्या बहुतांशी दिंड्या किराणा माल खरेदी करतात. यामध्ये तेल, तांदूळ, गहू, ज्वारी, मसाले यासह दररोज लागणारा विविध प्रकारचा माल खरेदी केला जातो.

यामध्यामातून भुसार विभागात दोन दिवसांत एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल होते. तसेच तरकारी विभागातून मोठ्या प्रमाणात कांदा, बटाटा, मिरची, लसूण खरेदी केला जातो. यामध्यामातून या विभागात साधारणतः एक कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Ashadhi Wari
Pune Fire News: मार्केटयार्डात मध्यरात्री पुन्हा भीषण आग; दोन कामगारांचा होरपळून मृत्यू

अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, ‘‘पुण्यात निघताना बहुतांशी दिंड्या बटाटा, कांदा, लसूण, हिरवी मिरची, आले पंधरा दिवस पुरेल इतके खरेदी करतात. कारण या वस्तू शक्यतो खराब होत नाहीत. त्यानंतर जशी जशी दिंडी पुढे जाईल तसे प्रत्येक दोन दिवसांनी लागेल तो भाजीपाला खरेदी केला जातो.

पुण्यातून पालखीचा पुढचा खरा प्रवास सुरू होतो. पुण्यामध्ये आलेल्या बहुतांशी वारकऱ्यांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था होते. पुण्यातून पुढे गेल्यानंतर त्या-त्या दिंड्यांना स्वतंत्र स्वयंपाक करण्याची गरज लागते. त्यानुसार बहुतांशी दिंड्या लागेल तेवढा माल पुण्यातून खरेदी करून पुढे जातात.

Ashadhi Wari
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर मोठी दुर्घटना! ऑईल टँकरला भीषण आग; काही जणांचा मृत्य झाल्याची भीती

७ लाख पत्रावळींची विक्री

आषाढी वारी सोहळ्यानिमित्त पानाच्या पत्रावळी, द्रोणला मागणी वाढली आहे. दिंड्यांचे प्रमुख पानाच्या पत्रावळी घेऊन जात आहेत. दोन ते तीन दिवसांत पुण्यातून साधारणतः ६ ते ७ लाख पत्रावळी विकल्या जातात. सर्व दिंड्यांना पुढे पंधरा दिवस पत्रावळींची गरज लागते. त्यानुसार त्या सर्व जण खरेदी करतात, असे व्यापारी निनाद मुळे यांनी सांगितले.

पुण्यातून पुढे प्रस्थान करताना अनेक दिंड्या किराणा माल मार्केट यार्डातून खरेदी करतात. भुसार विभागात बहुतांशी माल घाऊक दरात मिळतो, तसेच मार्केट यार्डात दरवर्षी २५ ते ३० हजार वारकरी मुक्कामाला असतात.

- राजेंद्र बाठीया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट चेंबर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com