पुणे - ‘तुका म्हणे धावा पांडुरंगा, आहे भक्तीचे ठायी रंगा...” याची अनुभूती आज पुणेकरांनी अन लाखो वारकऱ्यांनी घेतली.
पावसाच्या सरी अंगावर घेत, टाळ-मृदंगाच्या गजरात, पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी पंढरपूरला निघालेले वारकरी पुण्यात दाखल झाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगत्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पावन पादुकांचा पुण्यात मुक्कामी प्रवेश झाला आणि पुण्यनगरी भक्तीच्या रंगात रंगून गेली.