Ashadhi Wari : माऊलींच्या दर्शनासाठी पुणेकरांची तुडुंब गर्दी

आषाढीवारी पंढरीकडे निघाल्यानंतर दोन्ही पालख्या पुणे मुक्कामी काल (बुधवार, दि. २२ जून, २०२२) रोजी रात्री उशिरा दाखल झाल्या.
sant dnyaneshwar maharaj palkhi darshan
sant dnyaneshwar maharaj palkhi darshansakal
Summary

आषाढीवारी पंढरीकडे निघाल्यानंतर दोन्ही पालख्या पुणे मुक्कामी काल (बुधवार, दि. २२ जून, २०२२) रोजी रात्री उशिरा दाखल झाल्या.

कॅन्टोन्मेंट - थंडगार वारा, पोलिसांचा खडा पहारा... अन् वारकऱ्यांचा उत्साहभरा.... दोन वर्षांच्या खंडानंतर पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे स्वागत आणि त्यांच्यासमवेत खच्चून गर्दीतही वासुदेवाची टोपी डोक्यावर घेत सेल्फी घेण्याचा मोह महिलांना आवरता आला नाही. आषाढीवारीचा देखणा सोहळा मोबाईलमध्ये टिपण्यासाठी आबालवृद्धांची चढाओढ पाहायला मिळाली. गर्दीची तमा न बाळगता चिमुकल्यांनी विठू माऊलीची पालखी वारकरी भक्तांचे आकर्षण ठरली.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात अलोट गर्दी लोटली. खच्चून गर्दीमध्ये माऊलींचे दर्शन घेतल्याचे भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. स्पीकर, गर्दी, गोंगाट तरीही मोबाईलवर सेल्फी काढत संवाद साधण्याचे थांबले नाही, हे पाहून मोबाईलवेड्यांचे वैष्णवांनी अभिनंदनच केले.

आषाढीवारी पंढरीकडे निघाल्यानंतर दोन्ही पालख्या पुणे मुक्कामी काल (बुधवार, दि. २२ जून, २०२२) रोजी रात्री उशिरा दाखल झाल्या. तेव्हापासून पुणेकरांनी दर्शन घेण्यासाठी एकच धाव घेतली आहे. आज (गुरुवारी) भल्या सकाळपासून भाविकांनी चिमुकल्यांना घेऊन दर्शनाचा लाभ घेतला. वैष्णव भक्तांना पुणेकरांनी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था केली असून, मंडळांचे कार्यकर्तेही त्या कामात तल्लीन झाले आहेत.

देशभरात नव्हे, तर जगभरातला हा देखणा सोहळा पाहण्यासाठी वैष्णवभक्त धावून आले आहेत. देहू-आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पंधरा दिवस पायी वारी करणारा भक्त पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे.

शिवाजी शंकर भोसले, कामती- कराड - वारकरी -

यावर्षी पाऊसपाणी भरपूर झाला आहे, त्यामुळे समाधान वाटत आहे. वारी बंद होती, त्यामुळे जीवन अरसिक बनले होते. आता वारी सुरू झाल्यामुळे चैतन्यमय जीवन झाले असून, वारी कायम सुरू राहिली पाहिजे.

वैद्य सचिन छाजेड -

अश्वस्वरूप व आयुर्वेदिक पंचकर्म शोध केंद्राच्या वतीने माऊली भक्तांसाठी आयुर्वेद सुविधा मागिल बारा वर्षांपासून देत आहेत. आयुर्वेदिक औषध आणि पंचकर्म पंचकर्मामध्ये अग्निकर्म कर्मामुळे गुडघ्याचे वातविकार बरे होतात. गुडघेदुखीची तपासणी करून तेल, गोळ्या असे औषध देत आहे. गुडघ्याचे, मणक्याचे विकार, सर्दी, कफ, खोकला, ताप, थंडी, जुलाब, गॅसेस, पोट साफ न होणे, त्वचा विकार, थकवा येणे आदी आजारांवर उपचार केले जातात.

हिंगोली तालुक्यातील पारडी गावचे काशिनाथ सीतरामजी सांगळे मागिल २४ वर्षांपासून वारी करीत आहेत. मागिल दोन वर्षे वारीमध्ये खंड पडल्याने वाईट वाटले. मात्र, आता पुन्हा अशी वेळ येऊ नये, यासाठी पांडुरंगचरणी साकडे घातल्याचे सांगितले.

पारडी-औंढा (हिंगोली) येथील वनमाला विठ्ठल नागरे चार वर्षांपासून पंढरीची पायी वारी सुरू केली. संसाराचे सुख-दुःख विसरून पायी वारीमध्ये पांडुरंगाचे समाधान देत आहे, अशी त्यांची भावना आहे.

लक्ष्मी वेंकटी चौधरी (वय ६०, रा. उकळी, परळी वैजनाथ, परभणी) आतापर्यंत १५ वर्षांपासूनच्या वारीमध्ये मागिल दोन वर्षे खंड पडला. आता वारीमध्ये खंड पडू नये म्हणून पांडुरंग चरणी नतमस्तक होऊन साकडे घालत आहे.

सिंधू प्रभाकर चौधरी (वय ७०, रा. कर्भिडवाडी, परभणी) चार वर्षांपूर्वी वारी सुरू केली. मात्र दोन वर्षांपासून वारी करता आली नाही, त्याचे दुःख वाटत आहे.

दिव्या मोहिते (बी.एस्सी. बी.एड.) मागिल पाच वर्षांपूर्वीपासून माऊलींचे दर्शन घेण्यासाठी येते. मागिल वारी बंदनंतर यावर्षी वारीच्या दर्शनासाठी पहाटे तीन वाजल्यापासून बारीमध्ये थांबली आहे. माऊलींचे दर्शनच जीवनाचे दर्शन घडवत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com