Traditional Sheep Ring Ceremony katewadi
sakal
काटेवाडी - ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा गजर... राम कृष्ण हरी, ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करीत वैष्णवांच्या अलोट उत्साहामध्ये काटेवाडी (ता. बारामती) येथे गुरुवारी (ता. १६) संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात मानाच्या मेंढ्या धावल्या. रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी काटेवाडी येथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती.