Ashadi Wari 2023 : कपाळाला गंध, टाळ-मृदंगांचा ठेका ! तरुणाईला भावला माउलींचा पालखी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या दर्शनाला पुणेकरांनी मंगळवारी अलोट गर्दी
ashadi wari 2023 youth participate in sant tukaram and dyaneshwar maharaj palkhi sohala wari culture warkari pune
ashadi wari 2023 youth participate in sant tukaram and dyaneshwar maharaj palkhi sohala wari culture warkari puneSakal

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या दर्शनाला पुणेकरांनी मंगळवारी अलोट गर्दी केली होती. त्यात तरुणाई आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. कपाळाला गंध लाऊन टाळ-मृदंगांच्या ठेक्यावर तरुणाईने ताल धरला. हे क्षण मोबाईलमध्ये टिपण्यात ते रमले.

काही प्रतिक्रिया अशा...

मी पालखीचे दर्शन घेतले. येथील वातावरण भक्तिमय आहे. लहानपणापासूनच मी पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी येतोय. आजही मला तीच प्रसन्नता जाणवते.

- आर्यन निम्हण

वारकऱ्यांच्या सहवावासात राहून त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासारखा दुसरा आनंद नाही. त्यांच्याबरोबर अभंगाच्या तालावर ठेका धरायला मिळणं, फुगडी खेळायला मिळणं अविस्मरणीय आहे.

- श्रुतिका पंडित

ashadi wari 2023 youth participate in sant tukaram and dyaneshwar maharaj palkhi sohala wari culture warkari pune
Ashadi Wari 2023 : 'माऊली, माऊली' च्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान

वारीचे छायाचित्रण करण्याचा माझा हा पहिलाच अनुभव आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, हावभाव टिपणे; तसेच पारंपरिक पोशाखांतील ''बाल वारकऱ्यां''ना कॅमेऱ्यात टिपण्यात मला खूप मजा आली. त्यांच्या टाळ-मृदंगाच्या ठेक्यावरील हालचाली टिपताना काही काळ आपणही त्यांच्यासमवेत ठेका धरावा असे मनोमन वाटले.

- रोहन हुंबे

मैत्रिणींच्या आग्रहामुळे मी वारीत पहिल्यांदाच सहभागी झाले. मला फार प्रसन्न वाटले. दर्शनासाठी प्रशासनाने केलेले नियोजन खूप उत्तम आहे. तसेच वारकऱ्यांच्या सोयी-सुविधेसाठी सर्वजण खूप मदत करत आहेत.

- श्रुतिका आंबिलवाडे

ashadi wari 2023 youth participate in sant tukaram and dyaneshwar maharaj palkhi sohala wari culture warkari pune
Ashadi Wari 2023 : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात कॅलिफोर्नियातील बारा वारकऱ्यांचा सहभाग

वारीनिमित्त मला हा भक्तिमय सोहळा अनुभविता आला. मी वारकऱ्यांसारखा पारंपारिक पोशाख घालून त्यांच्यासमवेत ठेका धरला. वारकरी म्हणून विठुरायाच्या भक्तीत लीन होण्याची, तन मन हरपण्याची मजाच खूप वेगळी आहे.

- अभिजित तोडकर

नागपूरमध्ये असताना काही छोट्या छोट्या पालख्या नजरेस पडायच्या, परंतु असा ''माहोल'' मी आजवर अनुभवला नाही. इथल्या मित्रांसोबत मी पुण्यातील वारी अनुभवत आहे.

- मयूर वाटाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com