Pune : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून द्या- डॉ. राजेश देशमुख

जिल्हाधिकाऱ्यांचा पालखी सोहळा आढावा बैठकीत आदेश
Ashadi wari Provide facilities warkari Palkhi ceremony Dr Rajesh Deshmukh
Ashadi wari Provide facilities warkari Palkhi ceremony Dr Rajesh Deshmukhsakal
Updated on

पुणे : आषाढी वारी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, शौचालय, वाहतूक व्यवस्था, रस्ते, आरोग्य आदी पायाभूत सुविधा पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व सरकारी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना गुरुवारी (ता.४) दिला.

जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आज झालेल्या बैठकीत आढावा घेतला. या आढावा बैठकीत बोलताना त्यांनी हा आदेश दिला. या बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, पुणे शहर विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त ए. राजा, पिंपरी चिंचवडमधील परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त ॲड. विकास ढगे-पाटील, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, ‘‘यंदा दरवर्षीपेक्षा एक महिना आधीच पालखी सोहळा होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने या कालावधीत अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड पालिका, नगरपालिका आणि सर्व स्थानिक यंत्रणांनी पाणीपुरवठ्याबाबत दक्ष राहावे.

पालखी जूनमध्ये निघणार असल्याने उष्णतेचा घटकही लक्षात घेणे गरजेचे आहे.भाविकांची कोणतीही अडचण होणार नाही, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी पालखी मार्ग, पालखी तळ, विसाव्यांची संयुक्त पाहणी केली आहे. पालखी सोहळा प्रमुखांसमवेत समन्वयाने काम सुरू आहे. पाहणी आणि बैठकीत निदर्शनास आलेल्या बाबींच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांनी आपापल्या विभागांकडील कामे तातडीने पूर्ण करून घ्यावीत.’’

पाणी पुरवठ्याचे टँकर आणि शौचालयांच्या संख्येत गतवर्षीपेक्षा वाढ करावी, पालखीला टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व स्रोतांची तपासणी करावी.आवश्यक तेथे निर्जंतुकीकरणाची औषधे उपलब्ध करून द्यावीत, दवाखान्यांमध्ये औषधांचा साठा उपलब्ध करून ठेवावा, पालखीच्या रस्त्यावर कोठे अतिक्रमणे असल्यास, ती तत्काळ काढून टाकण्यात यावीत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com