Ashadi Wari : श्री बाबाजी चैतन्य महाराजाच्या पालखीचे ओतूर येथून पंढरपूरला आषाढी वारीसाठी प्रस्थान

सदर पायी पालखी दिंडीचे नेतृत्व चंद्रकात महाराज खंडागळे हे करत आहे
ashadi wari shree babaji chaitanya maharaj palkhi sohla
ashadi wari shree babaji chaitanya maharaj palkhi sohlasakal

श्री चैतन्य महाराज सेवा मंडळ वारकरी समाज,जुन्नर आंबेगाव,खेड तालुके संचलित, श्री बाबाजी चैतन्य महाराजाच्या पालखीचे ओतूर येथून प्रस्थान ज्ञानोबा तुकाराम ,राम कृष्ण हरी च्या मंत्रघोषात व टाळ मृदुंगाच्या गजरात संत तुकाराम महाराजाचे गुरु श्री बाबाजी चैतन्य महाराज यांच्या पालखीचे शनिवार ता.१० रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान वरून राजाच्या साक्षीने ओतूर येथून पंढरपूरला आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले असल्याची माहिती श्री चैतन्य महाराज सेवा मंडळ वारकरी समाज जुन्नर,आंबेगाव,खेड तालुके अध्यक्ष ज्ञानेश्वर कबाडी यांनी दिली.

जुन्नर,आंबेगाव व खेड या तीन तालुक्यातील वारकर्यानी संघटित करुन स्थापन केलेल्या श्री बाबाजी चैतन्य महाराज सेवा मंडळ वारकरी समाज या संस्थेतर्फे आयोजित केलेल्या या पालखी सोहळ्याचे हे ६३ वे वर्ष आहे. सदर पायी पालखी दिंडीचे नेतृत्व चंद्रकात महाराज खंडागळे हे करत आहे.

शनिवारी सकाळी उदापूर येथून चैतन्य रथ मिरवणूकिने ओतूरला समाधी स्थळापर्यंत आणण्यात आला त्यानंतर गंगास्नान झाल्या नंतर बी.व्ही मांडे, ज्ञानेश्वर कबाडी,संदिप शिंदे,योगेश डेरे यांच्या हस्ते समाधीस्थळावर नविन चांदीच्या पादुकाची व मुखवट्याचे पुजन आणि सामुहिक आरती करून विधिवत पणे पालखीत ठेवण्यात आल्या.

यावेळी कोंडाजी बाबा आश्रम अध्यक्ष किसन मेहेर,उद्योजक तथा चैतन्य महाराज दिंडी सोहळ्याचे कार्याध्यक्ष बी.व्ही.मांडे,सचिव दत्तात्रय कुलवडे, माजी जि.प.सदस्य आशा बुचके,शरद चौधरी,विघ्नहरचे उपाध्यक्ष अशोक घोलप,उद्योजक गजानन रोकडे, धोंडिभाऊ पिंगट,दगडू पवार,उत्तम भगत,श्रीहरी शिंदे,

ashadi wari shree babaji chaitanya maharaj palkhi sohla
Palkhi Sohala : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल

मल्हारी नायकोडी,सीताराम महाराज रटाटे,चंद्रशेखर लेंडे,विलास यादव,गजानन महाराज काळे ,दिलीप महाराज शिंदे,शंकर ढवळे,रमेश ढवळे,रविंद्र शेटे,संतोष केदारी,गणेश महाराज शिंदे,सुरेश महाराज बुट्टे,मारूती महाराज गाढवे हे व चैतन्य महाराज दिंडी सोहळा व कोंडाजी बाबा डेरे आश्रम सर्व विश्वस्त व जुन्नर आंबेगाव व खेड तालुक्यातील वारकरी मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.

सदर पायी पालखी ओतूर,बेल्हा, अळकुटी,निघोज,बेलवंडी,श्रीगोंदामार्गे मंगळवारी २७ रोजी श्री क्षेत्र पंढरपूरामध्ये प्रवेश करेल.येथे पालखीचा मुक्काम श्री बाबाजी चैतन्य महाराज मठात आठवडाभर राहणार आहे.

ashadi wari shree babaji chaitanya maharaj palkhi sohla
Palkhi Sohala : पालखीच्या स्वागतास सजली उद्योगनगरी; महापालिका, पोलिस प्रशासनाकडून नियोजन पूर्ण

या पालखी सोहळ्याला रथाला बैल जोडीचा मान उदापूर गावाला असतो.यावेळी तुकाराम हरीभाऊ कुलवडे यांच्या बैल जोडीला तो मिळाला आहे. श्री चैतन्य महाराज दिंडी सोहळा अध्यक्ष ज्ञानेश्वर कबाडी म्हणाले की ओतूर येथे श्री बाबाजी चैतन्य महाराज यांची संजीवन समाधी आहे.

कै.कोंडाजीबाबा डेरे व कै.सहादूबाबा वायकर यांनी सुरु केलेल्या या पालखीला मानाचे स्थान आहे.ओतूर येथून पालखी प्रस्थान वेळी वरूण राजाने ही हजेरी लावली.संस्थेकडून सुरू असलेले पंढरपुर येथे मठाचे बांधकाम अंतिम टप्यात असून वारकर्यानी बांधकामासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन कबाडी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com