Palkhi Sohala : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल

१५ ते २४ जूनदरम्यान पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये वाहनांना बंदी
Change traffic for Sant Dnyaneshwar Tukaram Maharaj Palkhi Ban on vehicles in palkhi stay villages from 15th to 24th June
Change traffic for Sant Dnyaneshwar Tukaram Maharaj Palkhi Ban on vehicles in palkhi stay villages from 15th to 24th Junesakal

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे-सासवड-लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर संत तुकाराम महाराज पालखी पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती इंदापूर अकलूज मार्गे पंढरपूरला जाते. या दोन्ही पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी १४ ते १८ जून या कालावधीत तर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी १५ जून ते २४ जून या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.

Change traffic for Sant Dnyaneshwar Tukaram Maharaj Palkhi Ban on vehicles in palkhi stay villages from 15th to 24th June
Palkhi Sohala : येरवडा कारागृहात रंगणार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गातील वाहतुकीत बदल :पुणे ते सासवड (सासवड मुक्काम) - १४ जूनच्या रात्री २ वाजल्यापासून ते १६ जूनच्या रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाटमार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही वाहतूक खडीमशीन चौक- कात्रज- कापूरहोळमार्गे सुरू राहील. सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे येईल.

सासवड ते जेजुरी (जेजुरी मुक्काम) व जेजुरी ते वाल्हे (वाल्हे मुक्काम) - १६ जून रोजी रात्री दोन ते १७ जूनच्या रात्री १२ वाजेपर्यंत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच नीरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी- पारगाव मेमाणे- सुपे- मोरगाव- नीरा या मार्गाचा वापर करावा.

Change traffic for Sant Dnyaneshwar Tukaram Maharaj Palkhi Ban on vehicles in palkhi stay villages from 15th to 24th June
Palkhi Sohala : पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी हडपसर सज्ज; असे असेल पालिका व पोलीस प्रशासनाचे नियोजन

वाल्हे ते लोणंद (लोणंद मुक्काम)- १८ जून रोजी पहाटे दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच नीरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड- जेजुरी- मोरगाव या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

लोणंद येथून पुढे फलटण मार्गे- १६ ते १८ जून या कालावधीत फलटण- लोणंद येथून पुणे येथे येणारी तसेच पुणे येथून फलटण-लोणंदकडे जाणारी वाहतूक शिरवळमार्गे जाईल.

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पर्यायी वाहतुकीचा मार्ग :

लोणी काळभोर ते यवत (यवत मुक्काम)- १५ जून रोजी पहाटे दोन ते रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली-केसनंद- राहू- पारगाव- चौफुला या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूरहून पुण्याकडे येणारी वाहतूक चौफुला- पारगाव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.

Change traffic for Sant Dnyaneshwar Tukaram Maharaj Palkhi Ban on vehicles in palkhi stay villages from 15th to 24th June
Pune Lok Sabha Election : मतदारसंघ निहाय निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर; पुणे लोकसभेचे निवडणूक प्रमुख मुरलीधर मोहोळ

यवत ते वरवंड ( वरवंड मुक्काम)- १६ जून रोजी पहाटे दोन ते रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहने थेऊर फाटा- केसनंद- राहू- पारगाव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गे जातील. सोलापूरकडून येणारी वाहने कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगाव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.

वरवंड ते उंडवडी, ता. बारामती (मुक्काम उंडवडी)- १७ जून रोजी पहाटे दोन ते रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहने चौफुला- पारगाव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूरहून पुण्याकडे येणारी वाहतूक कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगाव- चौफुला- वाघोली- पुणे या मार्गाचा वापर करतील.

उंडवडी ते बारामती (बारामती मुक्काम)- १८ जून रोजी पहाटे दोन ते रात्री १२ वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. ही वाहतूक भिगवनमार्गे बारामतीला जाईल. बारामतीकडून येताना भिगवनमार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येईल.

बारामती ते सणसर (सणसर मुक्काम) - १९ जून रोजी पहाटे दोन ते रात्री १२ वाजेपर्यंत जंक्शन ते बारामती हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतूक जंक्शन येथून कळसमार्गे बारामती- आष्टी वळविण्यात येईल. बारामतीकडून येताना भिगवन कळस जंक्शनकडे जाईल.

सणसर ते अंथुर्णे (अंथुर्णे मुक्काम) तसेच अंथुर्णे ते निमगाव केतकी (निमगाव केतकी मुक्काम)- २० जून रोजी पहाटे दोन ते २१ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आणि २१ जून रोजी पहाटे दोन ते २२ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती- कळंब- बावडा- इंदापूर या मार्गे किंवा बारामती- भिगवण- इंदापूर या मार्गे जातील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने इंदापूर- बावडा-कळंब- बारामती या मार्गे किंवा इंदापूर- भिगवण- बारामती या मार्गे जातील.

निमगाव केतकी ते इंदापूर (इंदापूर मुक्काम) २२ जून रोजी पहाटे दोन ते रात्री १२ वाजेपर्यंत निमगाव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतूक बंद राहील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक लोणी देवकर- कळस - जंक्शन मार्गे किंवा लोणी- देवकर- भिगवण मार्गे बारामतीकडे जातील.

इंदापूर- २३ जून रोजी पहाटे ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक ही अकलूज- बावडा- नातेपुतेमार्गे जातील. अकलूजकडून बारामती आणि पुण्याकडे जाण्यासाठी इंदापूर महामार्गाचा वापर करावा. इंदापूर शहरातील जुना पुणे सोलापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. त्यावरील वाहतूक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बायपासने वळविण्यात येईल.

इंदापूर ते सराटी (सराटी मुक्काम)- २४ जून रोजी पहाटे दोन ते रात्री १२ वाजेपर्यंत आणि २५ जून रोजी पहाटे दोन ते दुपारी १२ वाजेपर्यंत इंदापूर ते अकलूज रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या मार्गावरील वाहतूक इंदापूर- हिंगणगाव- टेंभुर्णी- गणेशगाव- माळीनगर- अकलूज या मार्गे जातील. तसेच अकलूज ते इंदापूर या मार्गावरील वाहने अकलूज- नातेपुते- वालचंदनगर- जंक्शन- भिगवण या मार्गे जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com