

Ashok Jagdale Shines in International Ironman Competition
Sakal
ओझर : अशोक भालचंद्र जगदाळे यांनी गोवा येथे झालेल्या इंटरनॅशनल आयर्न मॅन स्पर्धेत विक्रमी कामगिरी करून आयर्न मॅन हा किताब पटकावला आहे .यामुळे ओझर ( ता जुन्नर )गावचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकावले. या स्पर्धेमध्ये २ किलो मीटर समुद्रामध्ये पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग करणे व २१ किलोमीटर रनिंग करणे या बाबींचा समावेश होता. या सर्व बाबी आठ तासांचे आत त्यांनी पूर्ण करून हा किताब पटकावला.