PIFF : "कलाकाराला दाद हवी असते, मला ती पुणेकरांनी दिली"; अशोक सराफ भावूक

अशोक सराफ यांचा 'पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड'नं सन्मान; पुणेकरांच्या कौतुकानं झाले भावूक
PIFF : "कलाकाराला दाद हवी असते, मला ती पुणेकरांनी दिली"; अशोक सराफ भावूक
AHMEDSHAIKHSachin Bhivare

पुणे : ''कलाकाराला दाद हवी असते, मला ती पुणेकरांनी दिली"अशी कृतज्ञ भावना दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी गुरुवारी व्यक्त केली. १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (PIFF) महोत्सवात भारतीय चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांचा 'पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड'ने सन्मान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. पुरस्काराला उत्तर देताना पुणेकरांनी केलेल्या कौतुकामुळं ते क्षणभर भावूक झाले होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला महापौर मुरलीधर मोहोळ, कुलगुरू नितिन करमाळकर, एनएफआयचे प्रकाश मगदूम, मेघराजराजे भोसले, पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता,महोत्सवाचे कलात्मक संचालक समर नखाते, फाउंडेशन विश्वस्त सतीश आळेकर, एमआयटी स्कूल ऑफ फिल्म अॅण्ड टेलिव्हिजनचे संचालक अमित त्यागी, श्रीनिवासा संथानम, पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, सिरमचे सतीश मुंद्रा, यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

उद्घाटन कार्यक्रमावेळी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, गायिका मधुरा दातार यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच एमआयटीच्या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण झाले.

PIFF : "कलाकाराला दाद हवी असते, मला ती पुणेकरांनी दिली"; अशोक सराफ भावूक
अशोक सराफ यांचा १९ व्या पिफ अंतर्गत 'पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड'ने सन्मान

यावेळी बोलताना जब्बार पटेल म्हणाले, ''यावेळी महोत्सव होतो आहे याचा आनंद आहे. अनेक निर्बंध आहेत, तरीही महोत्सव नेहमीच्या उत्सवात होतो आहे. कोरोनामुळे महोत्सव पुढे ढकलावा लागला होता. 127 चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात ज्यांनी जीवावर उदार होत काम केले त्यांचा गौरव करणं हे जास्त महत्वाचे होते.''

पुरस्काराला उत्तर देताना अशोक सराफ म्हणाले, ''बोलणे ही सगळयात कठीण गोष्ट आहे. माईकवर नाही बोलता येत. शेवटी माझं नाव आहे हे सगळयात महत्वाचे. कला जाणणारे लोक हवे असतात. त्याची कदर करणारं कुणी हवं असतं. कदर करणं महत्त्वाचं आहे. कलाकाराला दाद हवी असते. तो त्याचा भुकेला असतो. पुण्याच्या लोकांचे नेहमीच माझ्यावर प्रेम होते. ते असेच राहू दे''

१५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी

२ ते ९ डिसेंबर, २०२१ दरम्यान पार पडणाऱ्या या महोत्सवादरम्यान चित्रपट रसिकांना उत्कृष्ठ दर्जाच्या चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. सुमारे १५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी चित्रपट रसिकांना मिळणार आहे.

या चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळेल महोत्सव

सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स व लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (NFAI) येथे यंदा महोत्सवातील चित्रपट दाखवले जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com