

Legal Conflict: Ashtavinayak Shrines Unite to Oppose Proposed Devasthan Inam Abolition Bill 2026
Sakal
थेऊर : महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता आणि कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक देवस्थानांच्या शेकडो एकर जमीनीला धोका पोहोचवणारा ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम,२०२६’ कोणत्याही अटीशिवाय राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावा,अशी एकमुखी मागणी आज येथे आयोजित अष्टविनायक मंदिरांच्या विश्वस्तांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.