१५ दिवसांत निघाले सातारा रस्त्यावरील डांबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road potholes

पुणे-सातारा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याबाबत सकाळने वृत्त दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सरकारकडे केली होती.

१५ दिवसांत निघाले सातारा रस्त्यावरील डांबर

कात्रज - पुणे-सातारा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याबाबत सकाळने वृत्त दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सरकारकडे केली होती. मात्र, त्यानंतर निकृष्ट दर्जाचे डांबर टाकून रस्ता दुरुस्त करण्याचे काम केले होते. मात्र, केवळ १५ दिवसात रस्त्यावरील डांबर उलथून रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

नागरिक आणि वाहनचालक हैराण झाले असून रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर रस्त्याची दुरुस्ती करताना त्याचे काम निकृष्ट होऊ नये याची काळजी घेण्याची मागणीही होत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येते. खड्डे बुजविण्यात आले.

परंतु, ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्याचा काहीच फायदा झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता देवेन मोरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

प्रतिक्रिया

खड्ड्यांमुळे गाड्या लेन क्रॉस करून विरुद्ध लेनला जातात आणि वाहतूक कोंडीत भर पडते. अवजड वाहने बस यांची संख्या रस्त्यावर जास्त आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम केल्यास लगेच दुरवस्था होते. खड्ड्यांमुळे असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत.

- विकास सुर्यवंशी, स्थानिक नागरिक

Web Title: Asphalt On Satara Road Left In 15 Days Katraj

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Satarakatrajasphalt