

Pre-Monsoon Road Repairs in Focus: Pune ZP Chief Directs Officials
sakal
पुणे : ‘‘जिल्हा परिषद अंतर्गतच्या ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांवरील कामांचा दर्जा चांगला राखण्यात यावा, त्याचबरोबर सर्व कामे पावसाळ्यापूर्वी म्हणजेच २५ मेअगोदर पूर्ण करण्याच्या सूचना बांधकाम विभागामधील दक्षिण आणि उत्तर दोन्ही विभागाच्या अभियंत्यांना दिल्या आहेत,’’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सोमवारी (ता. २३) पत्रकार परिषदेत दिली. तसेच, शिक्षण विभागात रिक्त असलेल्या पदांवर तातडीने अधिकारी मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.