

MPSC Result Delay Sparks Concern Among Candidates Waiting Since 2 Years
sakal
-प्रज्वल रामटेके
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) निकालाबाबत ‘तारीख पे तारीख’चा अनुभव राज्यसेवा २०२४ च्या उमेदवारांना येत आहे. जाहिरात निघून सव्वा दोन वर्षे उलटली. मुलाखती होऊन पाच महिने झाले. तात्पुरती यादी लागूनही दोन महिने संपले, तरी आयोगाला अंतिम निकालाचा मुहूर्त मिळालेला नाही.