
वत्र बहिणीसोबत असलेल्या प्रेमप्रकरणाच्या कारणवरून एकाने वडिलांच्या मदतीने तरूणाच्या भावावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पुणे ः सावत्र बहिणीसोबत असलेल्या प्रेमप्रकरणाच्या कारणवरून एकाने वडिलांच्या मदतीने तरूणाच्या भावावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेत तरुणाचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरूवारी रात्री अकरा वाजता दांडेकर पुल परिसरात घडली.
"मी इथला भाई आहे' अशी धमकी देत मागितली खंडणी
हर्षद गणेश जातेगावकर (वय 23), गणेश जातेगावकर (वय 55, रा. शुक्रवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. या घटनेत समीर हातागळे हा गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आकाश बापू मस्के याने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरचा भाऊ अमनचे एका मुलीवर प्रेम होते. त्यामुळे अमनचा राग मुलीचा सावत्र भाऊ हर्षदला होता. त्याच कारणावरुन, गुरूवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास समीर व त्याचा मित्र आकाश हा त्यांच्या घरासमोर शेकोटी पेटवून बसला होता.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
हर्षद व त्याचे वडील गणेश जातेगावकर यांनी घटनास्थळी येऊन समीरवर कोयत्याने वार केले. या घटनेत समीर गंभीर जखमी झाला. त्यानंतर नागरीकांनी त्यास उपचारांसाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आरोपींनी तेथून पळ काढला. या प्रकरणाचा तपास दत्तवाडी पोलिस करीत आहेत.