गुडघ्याखालील कृत्रिम पाय प्रत्यारोपणाद्वारे 250 अपंगांना मदत

Rotary-Club-of-Pune-Magarpatta
Rotary-Club-of-Pune-Magarpatta

पुणे - रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा सिटीद्वारे (आरसीपीएमसी) सामाजिक आणि वैद्यकीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यातीलच एका उपक्रमा अंतर्गत गुडघ्याखाली पाय नसलेल्यांना कृत्रिम पाय प्रत्यारोपणाद्वारे 250 हून अधिक अपंगांना मदत करण्यात आली आहे. अशी माहिती नुकतीच क्लबच्या वतीने देण्यात आली.

'आरसीपीएमसी'च्या नवीन रोटरी वर्षाचा स्थापना सोहळा नुकचात पार पडला. कोव्हिड 19च्या पार्श्वभूमीवर हा सोहळा व्हर्च्युअल पद्धत्तीन साजरा करण्यात आला असून यावेळी क्लबच्या उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी डॉ. कुलदीप चरक यांनी सुनिल हरपाळे यांच्याकडून अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला, तर रवी मिश्रा यांना मनोज राजोळ यांच्या हस्ते क्लबचे सचिव म्हणून कार्यभार सोपवण्यात आला. या समारंभास जिल्हा गव्हर्नर इलेक्‍ट आरटीएन रश्मी कुलकर्णी आणि पीडीजी आरटीएन मोहन पलेशा आदी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच क्लबतर्फे नोबेल हॉस्पिटलच्या सहकार्याने, त्यांच्या कौशल्य आणि सुविधांसह, ‘गुडघ्याच्या वर’ अपंगांना मदत करण्यासाठी आणखी एक वैद्यकीय प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. प्रयोग व सुविधांव्यतरिक्त , मास्क डोनेशन, पेडलवर चालित सॅनिटायझर स्टेशन यासारख्या सेवा देखील आरसीपीएमसी मार्फ़त देण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com