Pune Crime : एटीएम कार्डची अदलाबदल करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; आरोपीकडून १६६ एटीएम कार्डसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

एटीएम कार्डची अदलाबदल करून २१ ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.
pune crime
pune crimesakal
Updated on

पुणे - एटीएम कार्डची अदलाबदल करून २१ ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून १६ गुन्हे उघडकीस आणत आरोपीकडून १६६ एटीएम कार्ड आणि रोकडसह १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राजू प्रल्हाद कुलकर्णी (वय ५४, रा. अलानहली, म्हैसूर, कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ व्यक्तीच्या बॅंक खात्यातून २२ हजार रुपये काढून घेतले.

हा प्रकार लालबहादूर शास्त्री रस्त्यावरील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम सेंटरमध्ये दोन फेब्रुवारी रोजी घडला होता. याबाबत विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक मनोज बरूरे, पोलिस अंमलदार मयूर भोसले, आशिष खरात यांनी खबऱ्याच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला.

आरोपीच्या ताब्यातून वेगवेगळ्या बँकेचे १६६ एटीएम कार्ड जप्त केले. आरोपीने शहरात आणखी काही नागरिकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. संबंधित नागरिकांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक विजयमाला पवार यांनी केले आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त संदीपसिह गिल, सहाय्यक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विजयमाला पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके, पोलिस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलिस अंमलदार अशोक माने, मयूर भोसले, सचिन कदम, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन मोरे, शिवा गायकवाड, संतोष शेरखाने, नितीन बाबर व सागर मोरे यांनी ही कारवाई केली.

अशी करीत होता ज्येष्ठांची फसवणूक -

ज्येष्ठ नागरिक पेन्शनची रक्कम काढण्यासाठी एटीएम सेंटरमध्ये येतात. ज्या ज्येष्ठ नागरिकांना एटीएम मशीनमधून पैसे काढण्यास अडचण येते, त्यांना तो मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्ड आणि पिन क्रमांक घेत असे. हातचलाखीने स्वत:कडील एटीएम कार्ड मशिनमध्ये टाकून पिन क्रमांक जुळत नाही. त्यासाठी बँकेत चौकशी करा, असे सांगून तो जात असे. त्यानंतर तो त्या एटीएम कार्डद्वारे पैसे काढून फसवणूक करीत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com