

सासवड, ता. २४ : भिवरी (ता. पुरंदर) येथील बँक ऑफ बडोदाचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न सुरक्षा सायरनमुळे फसला. चोरट्याने एटीएमचा कप्पा उचकटला, मात्र सायरन वाजताच त्याने पळ काढल्याने मोठी रोकड बचावली. याप्रकरणी सासवड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बँकेचे व्यवस्थापक सागर भोजने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ जून रोजी मध्यरात्री १२:५६ च्या सुमारास माकड टोपी घातलेला एका अज्ञात इसमाने एटीएम केंद्रात शिरला. त्याने लोखंडी कटावणीच्या साहाय्याने कॅशचा कप्पा उचकटण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी बँकेच्या सुरक्षा यंत्रणेचा सायरन जोरात वाजल्याने चोरटा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.
सायरनचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक व पोलिसांनी तातडीने धाव घेतली, मात्र तोपर्यंत चोरटा पळून गेला होता. सकाळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता एटीएमचे नुकसान झाले होते, मात्र सर्व रोकड सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. सासवड पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे अधिक तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.