पुण्यातील सनबर्न फेस्टीव्हलमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रयत्न; आरोपीस अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

  • पुण्यातील सनबर्न फेस्टीव्हलमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीस "एटीएस'कडून अटक 

पुणे : पुण्यातील बावधन येथे 2017 मध्ये झालेला सनबर्न फेस्टीव्हल बॉम्बस्फोटाद्वारे उधळून लावण्याच्या प्रयत्नातील आरोपीस राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पश्‍चिम बंगाल येथून अटक करण्यात आली. संबंधीत आरोपीचा नालासोपारा स्फोटक व हत्यार साठ्याशीही संबंध आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रताप जुधीष्ठर हाजरा उर्फ प्रताप हाजरा (वय 34, रा. नैनपुर उष्टी, पश्‍चिम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईतील काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हाजरा याने गावठी बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. डिसेंबर 2017 मध्ये पुण्यातील बावधन येथे झालेल्या पाश्‍चात्य संगीत महोत्सव "सनबर्न फेस्टिव्हल'मध्ये बॉम्बस्फोट करून घातपात घडवून आणण्याच्या कटामध्ये त्याचा सहभाग होता.

पाकिस्तानचा भारतीय संविधान जाळण्याचा कट

महाराष्ट्र एटीएसने कलकत्ता पोलिस, पश्‍चिम बंगाल पोलिस व एसटीएफ यांच्या मदतीने हाजरा यास सोमवारी (ता.20) अटक केली. त्यास मुंबई येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यास 30 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ATS arrested for trying to bomb blast at Sunburn Festival in Pune