पाकिस्तानचा भारतीय संविधान जाळण्याचा कट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

ब्रिटनमधील पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांनी लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर आंदोलन आणि भारतीय संविधानाच्या प्रती जाळण्याचा कट रचला असल्याची माहिती मिळाली आहे.

लंडन : ब्रिटनमधील पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांनी लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर आंदोलन आणि भारतीय संविधानाच्या प्रती जाळण्याचा कट रचला असल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांच्या आंदोलनाबद्दल भारतीय उच्चायुक्तांनी यूकेच्या प्रशासनाकडे चिंता व्यक्त करत तक्रार केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लंडनमधील भारतीय उच्चायुक्त रुची घनश्याम यांनी यूकेच्या गृहसचिव प्रिती पटेल यांना फोन करत संविधानाच्या प्रती जाळण्याच्या कटाबद्दल माहिती दिली आहे. भारतीय उच्चायुक्तांनी गृह सचिव प्रिती पटेल यांच्याबरोबर भारत-ब्रिटन संबंध अधिक बळकट कसे होतील याबद्दल फोनवरुन चर्चा केली. प्रजासत्ताक दिनी पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांच्या आंदोलनामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याबद्दलची चिंता त्यांनी गृह सचिवांच्या कानावर घातली आहे.

सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्याची मागणी

भारतीय वंशाच्या नागरिकांनी युकेच्या यंत्रणांशी पत्रव्यवहार करुन या संभाव्य आंदोलनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. २६ जानेवारीला आंदोलन करण्यासाठी पाकिस्तानकडून मोठया प्रमाणावर लोकांना गोळा करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistani groups plan to burn Indian Constitution in London on Republic Day