

ATS Crackdown: Suspect Behind Explosive Device at Pune Hospital Arrested
esakal
पुणे: हडपसर परिसरातील उषाकिरण रुग्णालयात टायमर बॉम्ब स्फोटक ठेवून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपूर रेल्वे जंक्शन येथून अटक केली. आरोपीची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणामागील हेतू, त्याचे साथीदार आणि इतर ठिकाणी अशाच प्रकारचा कट रचण्यात आला होता का, याचा तपास यंत्रणांकडून सुरू आहे.