ATS Operation Pune
sakal
पुणे : जुबेर हंगरगेकरला अटक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या साथीदारांनी या ठिकाणावरून काही संशयित पुस्तके-प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे जमा केली. त्यानंतर ती सर्व कागदपत्रे काळेपडळ येथील एका धार्मिक स्थळाच्या मोकळ्या जागेत जाळल्याचे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे. ‘एटीएस’च्या तपास पथकाने काळेपडळ येथील धार्मिक स्थळाच्या मोकळ्या जागेचा पंचनामा करून अर्धवट जळालेली काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. जुबेरचा साथीदार एका रिक्षातून येऊन कागदपत्रे जाळत असल्याचे तेथील ‘सीसीटीव्ही’मध्ये निदर्शनास आले आहे. याबाबत सात साक्षीदारांकडे तपास करण्यात आला आहे. याशिवाय जुबेर व त्याचे साथीदार कौसरबागेतील एका इमारतीच्या तळघरातील मदरशात (मकतब) एकत्रित यायचे. तपास अधिकाऱ्यांनी या ठिकाणचा पंचनामा केला असून, सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.