पुणे : थेरगावमध्ये महिलेवर कोयत्याने वार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

महिलेचा विनयभंग करीत कोयत्याने वार केल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना थेरगाव येथे घडली. 
याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पिंपरी : महिलेचा विनयभंग करीत कोयत्याने वार केल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना थेरगाव येथे घडली. 
याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पुणे विमानतळावर चीनच्या प्रवाशाला उलट्यांचा त्रास; कोरोनाचा संशय नायडू रुग्णालयात दाखल

त्यानुसार स्वप्नील शिंदे, निलेश तायडे यासह आणखी एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी (ता. 5) रात्री साडेआठच्या सुमारास थेरगाव गावठाण येथून फिर्यादी महिला रस्त्याने पायी जात असताना आरोपी स्वप्नील शिंदे याने महिलेचा हात पकडून त्यांच्याशी अश्‍लील वर्तन केले. त्यानंतर फिर्यादी महिला त्यांचे पती व मुलासह दीराच्या घरी गेले असता आरोपी शिंदे हा फिर्यादीच्या दीराच्या घरी गेला. दीराला घराबाहेर बोलावून मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी व त्यांचे पती मध्ये गेले असता शिंदे याने फिर्यादीच्या हातावर कोयत्याने वार केला. तर आरोपी निलेश तायडे याने फिर्यादीच्या दीराच्या पाठीत कोयता मारला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यामध्ये दोघेही जखमी झाले. तर अनोळखी आरोपीने फिर्यादीच्या पतीस हाताने व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attack on a lady with sickle in Thergao Pune