पुणे विमानतळावर चीनच्या प्रवाशाला उलट्यांचा त्रास; कोरोनाचा संशय नायडू रुग्णालयात दाखल

सागर आव्हाड
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

दरम्यान,  ली सियोन असे या चिनी प्रवाशाचे  नाव  आहे. त्याला नायडू हॉस्पिटलमधे हलवण्यात आलं आहे.

पुणे : एअर इंडियाचे विमान आज सकाळी दिल्लीहून पुण्याला निघाले. या विमानात 177 प्रवासी होते. हे विमान पुण्यात पोहचताच त्यापैकी चीनचा नागरिक असलेल्या एका प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागले, तसेच त्याला उलट्यांचा त्रास होऊ लागला. या कारणास्तव त्या प्रवाशाला थेट नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचा संशय डाॅक्टरांनी व्यक्त केला आहे.  

'कोरोनापासून जगाला वाचवायचंय तर..'; 6 कोटी नागरिकांबाबत चीन सरकारचा मोठा निर्णय!

दरम्यान, ली सियोन असे या चिनी प्रवाशाचे  नाव  आहे. त्याला नायडू हॉस्पिटलमधे हलवण्यात आलं आहे. मात्र विमानातील इतर प्रवासी निघून गेले. हे विमान पुन्हा दिल्लीला जाणार होतं. मात्र चीनी प्रवाशाने केलेल्या उलट्यांमुळे विमान स्वच्छ करायला वेळ लागला. यामुळे या विमानाला उशीर झाला. त्या विमानाने दिल्लीला जाणार असलेल्या प्रवाशांनी विमानाला उशीर का होतोय याची चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला. नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेला चीनी प्रवासी तो मागील एक महिन्यापासून दिल्लीत असल्याचा दावा करतोय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infected suspected patient found in Delhi-Pune flight

टॅग्स
टॉपिकस