esakal | भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावर हल्ला, मुढाळे येथील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावर हल्ला, मुढाळे येथील घटना

sakal_logo
By
चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर : भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून लोखंडी हत्याराने वार केल्याचा प्रकार बारामती तालुक्यातील मुढाळे येथे मंगळवार (ता. २०) रात्री नउच्या दरम्यान घडला. लखन मल्हारी सकाटे असे वार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

त्याला सहकार्य केल्याबद्दल छाया मल्हारी सकाटे, मल्हारी दिनकर सकाटे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. संजय पोपट सकाटे असे भांडण सोडवणाऱ्या फिर्यादी व्यक्तीचे नाव आहे. हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत.

हेही वाचा: चार महिन्याच्या बाळाच्या हृदयावर गुतांगुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

संजयचा चुलत भाऊ दादा भगवान सकाटे व आरोपी लखन यांच्यात भांडणे झाली. समाजात वाद नको म्हणून समाज मंदिराजवळ भांडण सोडवण्याचा प्रयत्न संजय यांनी केला. त्याचा राग मनात धरून संजयला समाज मंदिरामागे बोलावून लखनने कुटुंबीयांच्या साथीने लोखंडी हत्याराने वार केले.

loading image