वेल्हे, (पुणे) - राजगड तालुक्यातील पानशेत परिसरातील कादवे गावच्या ग्रामपंचायतीच्या विहीरीकडे जाणाऱ्या रस्त्याची सरकारी अधिकाऱ्यांसह पाहणी केल्याच्या कारणावरून भावासह (कादवे, ता. राजगड) चे सरपंच अनंता गणपत बिरामणे (वय-४५) यांच्यावर पाळीव कुत्र्यासह काठ्या व दगडांनी हल्ला करण्यात आल्याची घटना सोमवार (ता. १५ ) रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात सरपंच अनंता व त्यांचा भाऊ विनोद गणपत बिरामणे (वय-४०) हे जखमी झाले आहेत.