पुणे : चुलत भावाच्या लग्नाला बोलावले नाही म्हणून.... 

attack on one by sharp weapons due to anger over not calling at cousins wedding
attack on one by sharp weapons due to anger over not calling at cousins wedding

पुणे : चुलत भावाच्या लग्नाला न बोलविल्याच्या रागातून तिघांनी एका तरुणावर धारदार शस्त्रांनी वार केले. ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजता येरवडा येथील सुरक्षानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. दरम्यान, येरवडा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली. 

Video : अजित पवार हात जोडून करताहेत नमस्कार; कारण...

खनासिंग अजितसिंग कल्याणी (वय 42), नीलेश धर्मा खंडागळे (वय 29), अमितसिंग सतिशसिंग जुनी (वय 21, तिघेही रा. रामटेकडी, हडपसर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कुंदनसिंग बावरी (वय 28, अशोकनगर रा. येरवडा ) यांनी फिर्याद दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहे. फिर्यादी यांनी एक कंपनी सुरू केली होती. संबंधीत कंपनी सुरू ठेवण्यासाठी फिर्यादी यांना एक लाख रुपयांचा हफ्ता दिला नाही. याबरोबरच फिर्यादी यांचे चुलतभावाचे लग्न असतानाही फिर्यादी यांनी आरोपींना लग्नासाठी बोलावले नाही. त्याचा राग मनात धरून आरोपींनी शुक्रवारी रात्री दहा वाजता फिर्यादी यांना येरवड्यातील सुरक्षानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर फिर्यादीं बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी फिर्यादी यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर येरवडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ तीन आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बलभिम ननवरे करीत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com