'तु हमसे बडा भाई है क्‍या' म्हणत तरुणावर चायनीज कोयत्याने वार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

फिर्यादी जोयेब व संशयीत आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शुक्रवारी सात जोयेब हा त्याच्या घराजवळ थांबला होता. त्यावेळी सैफ यास जोयेब हा त्याला मारणार असल्याचा समज झाला. त्यातून तिघांनी जोयेब यास गाठून "तु हमसे बडा भाई है क्‍या' म्हणत त्यास मारहाण करीत चायनीज कोयत्याने त्याच्यावर वार केले.

पुणे : मारहाण करणार असल्याचा समज झाल्याने एका तरुणावर तिघांनी चायनीज कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजता मंगळवार पेठेत घडली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुनाफ शेख, सैफ व इरफान चिकना (तिघेही रा. मिठानगर, कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जोयेब जमील शेख (वय 28, रा. काळा वाडा, मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. तिघांविरुद्ध गंभीर मारहाण, हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जोयेब व संशयीत आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.

संघनेते पी. परमेश्वरन यांचे निधन; मोदी, शहा यांच्यासह अनेकांची श्रद्धांजली

शुक्रवारी सात जोयेब हा त्याच्या घराजवळ थांबला होता. त्यावेळी सैफ यास जोयेब हा त्याला मारणार असल्याचा समज झाला. त्यातून तिघांनी जोयेब यास गाठून "तु हमसे बडा भाई है क्‍या' म्हणत त्यास मारहाण करीत चायनीज कोयत्याने त्याच्यावर वार केले. या घटनेमध्ये जोयेब गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरीकांनी त्यास तत्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on young man by chinese sharp weapon in mangalwar Peth In Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: